भारताचे क्रिकेटपटू के एल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या लग्नानंतर आता पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वातही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदी हा गुरुवारी लग्नबंधनात अडकला.
शाहीनने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या मुलीशी लग्न केले असून क्रिकेट विश्वात या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.