मुंबई, 31 जानेवारी : सोमवारी पाकिस्तानच्या पेशावर येथील मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला. पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत असताना झालेल्या या बॉम्बस्फोटात तब्बल 60 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यात 150 जण जखमी झाली आहेत. पाकिस्तानमधील स्फोटानंतर पाकमध्ये हाहाकार उडाला असून यावर स्टार क्रिकेटपटूने ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर मोहम्मद रिझवान याने आपल्या देशात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. त्याने सोमवारी रात्री उशीरा ट्विट करत लिहिले, "आम्ही एक शूर समुदाय आहोत. ते आमचा आत्मा तोडू शकत नाहीत आणि आमची मशीद रिकामी करू शकत नाहीत, इंशाअल्लाह. मनात फक्त एवढाच प्रश्न येतो की ह्याची तक्रार कोणाकडे करायची? अल्लाह पाक पाकिस्तानचे रक्षण करो आणि सर्वत्र प्रेम आणि शांततेचे वारे वाहू दे. आमीन".
Hum bahadur Qaum hain. Na hi ye sanehay hamare hoslay torr sakte hain or na hamari masajid khali ker sakte hain, in sha Allah. Bus dil me yahi sawaal aata hai k iska shikwa hum kis se karain? Allah Pak Pakistan ki hifazat farmayain or mohabbat or aafiyat ki hawa chla dain, Ameen.
— Muhammad Rizwan (@iMRizwanPak) January 30, 2023
रिझवान याने मशिदीत झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याचा निषेध करत लोकांना संयम ठेवण्याचा संदेश दिला. परंतु रिझवानला यावरून काही नेटकऱ्यांनी सुनावले.
रिझवानला प्रत्युत्तर देताना मोहसीन खान नावाच्या नेटकाऱ्याने लिहिले की, 'भाई, तुम्ही किती काळ शूर समुदाय असल्याचे ढोंग करणार आहात? आम्ही प्रत्येक वेळी त्याग करतो आणि स्वतःला दिलासा देतो की आम्ही एक शूर समुदाय आहोत. हे सर्व कधी ठीक होईल? मूलभूत साधे जीवन जगण्याचाही आपल्याला हक्क नाही का?
हे ही वाचा : रिषभ पंतला 'या' दिवशी मिळणार डिस्चार्ज! अपघाताच्या एक महिन्यानंतर परतणार घरी
अजून एका नेटकाऱ्याने रिझवानला म्हंटले, "भाऊ हे सर्व तुमच्याकडे ठेवा, आम्हाला या शौर्याची गरज नाही. असे शौर्य ज्यामध्ये कोणताही गुन्हा न करता आपला जीव द्यावा लागतो. आम्हाला या सर्वांची गरज नाही! अल्लाह आपल्या सर्वांवर दया करो, कारण आमचे संरक्षक आम्हाला वाचविण्यात अयशस्वी ठरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, Cricket, Cricket news, Pakistan, Pakistan Cricket Board, Suryakumar yadav, Virat kohli