जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रिषभ पंतला 'या' दिवशी मिळणार डिस्चार्ज! अपघाताच्या एक महिन्यानंतर परतणार घरी

रिषभ पंतला 'या' दिवशी मिळणार डिस्चार्ज! अपघाताच्या एक महिन्यानंतर परतणार घरी

रिषभ पंतला 'या' दिवशी मिळणार डिस्चार्ज! अपघाताच्या एक महिन्यानंतर परतणार घरी

काही दिवसांपूर्वी रिषभ पंतच्या गुडघ्यांवर करण्यात आलेली लिगामेंट सर्जरी यशस्वी झाली होती. त्यानंतर पंत उपचारांना देखील योग्य प्रतिसाद देत आहे. अशातच आता त्याच्या डिस्चार्जबाबत माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 जानेवारी : भारतीय संघाचा युवा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपघाताच्या तब्बल एक महिन्यांनंतर रिषभ पंत याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सध्या पंत मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. 30 डिसेंबर रोजी दिल्ली येथून आपल्या घरी जात असताना रिषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पायावर लिगामेंट सर्जरी करण्यासाठी त्याला एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बीसीसीआयकडून रिषभच्या प्रकृतीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यात येत आहे. हे ही वाचा : ऑस्ट्रेलिया सीरिजआधी विराट-अनुष्का पोहोचले ‘बाबां’च्या चरणी, पाहा PHOTO काही दिवसांपूर्वी रिषभ पंतच्या गुडघ्यांवर करण्यात आलेली लिगामेंट सर्जरी यशस्वी झाली होती. त्यानंतर पंत उपचारांना देखील योग्य प्रतिसाद देत आहे. अशातच आता त्याच्या डिस्चार्जबाबत माहिती समोर आली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार पंतला या आठवड्यात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पंतवर एका महिन्यात आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल. दुसरी शस्त्रक्रिया केव्हा होणार हे डॉक्टरच ठरवतील. मात्र या आठवड्यात त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहे. तो लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे’.

News18लोकमत
News18लोकमत

रिषभ पंत याने अपघातानंतर पंधरा दिवसांनी आपल्या सोशल मीडियावरून त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते. तसेच अपघातानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करणाऱ्या तरुणांचे देखील त्यांना धन्यवाद मानले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात