जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आफ्रीदीला केलं सस्पेंड, पाहा का घातली खेळण्यावर बंदी?

Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आफ्रीदीला केलं सस्पेंड, पाहा का घातली खेळण्यावर बंदी?

पीसीबीकडून एका खेळाडूवर निलंबनाची कारवाई

पीसीबीकडून एका खेळाडूवर निलंबनाची कारवाई

Cricket: आफ्रीदी नॅशनल टी20 कपमध्ये खैबर पख्तूनख्वाह संघाचं प्रतिनिधित्व करतो. या स्पर्धेदरम्यान असिफ आफ्रिदीनं पीसीबीच्या भ्रष्टाचारासंबंधी काही नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर**:** पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली आफ्रीदीवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पीसीबीच्या अँटी करप्शन युनिटनं ही कारवाई केली आहे. यासंदर्भात पीसीबीनं अधिकृत पत्रकही जाहीर केलं आहे. आता तुम्ही म्हणाल हा आफ्रिदी म्हणजे शाहीद आफ्रिदी आहे का? की शाहीन आफ्रीदी? तर नाही, हा आहे पाकिस्तानच्या नॅशनल टी 20 कपमध्ये खेळणारा लेफ्ट आर्म स्पिनर असिफ आफ्रीदी. आफ्रीदीवर पीसीबीची मोठी कारवाई असिफ आफ्रीदी नॅशनल टी20 कपमध्ये खैबर पख्तूनख्वाह संघाचं प्रतिनिधित्व करतो. या स्पर्धेदरम्यान असिफ आफ्रिदीनं पीसीबीच्या भ्रष्टाचारासंबंधी काही नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. पीसीबी कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल 2.4 नुसार त्याला नोटीसही जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या 14 दिवसात आफ्रीदीला यावर उत्तर द्यावं लागेल. तोपर्यंत त्याला पाकिस्तानातल्या कुठल्याही स्पर्धेत खेळता येणार नाही.

News18

पाकिस्तान संघातही झाली होती निवड असिफ आफ्रिदीची याच वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघात निवड झाली होती. पण त्या दौऱ्यात एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 35 वर्षांचा असिफ गेली 13 वर्ष पाकिस्तानकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानं 1303 धावा आणि 118 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये त्यानं 63 विकेट घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात