लाहोर, 09 डिसेंबर : इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये इंग्लंडचा संघ ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे तिथून जवळच काही अंतरावर गोळीबाराची घटना घडली आहे. जवळपास १७ वर्षांनी इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान दौऱ्यात संघाच्या सुरक्षेबाबत आधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. आज शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना मुलतान क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. यासाठी इंग्लंडचा संघ मैदानापासून काही अंतरावर असणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी आहे.
हेही वाचा : 2022 टीम इंडियासाठी निराशाजनक, एक-दोन नव्हे तर 8 लाजीरवाणे पराभव
गोळीबार प्रकरणी पाकिस्तान पोलिसांनी चौघांना अटक केलीय. इंग्लंडचा संघ मुलतानच्या मैदानावर सरावाला निघण्याच्या आधी काही वेळापूर्वी हा गोळीबार झाला. सध्या इंग्लंडच्या संघाला उच्च दर्जाची सुरक्षा पुरवली जात आहे. तसंच गोळीबाराच्या घटनेनंतरही इंग्लंडच्या संघाने सरावाला जाण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, रोहितसह 3 खेळाडू आऊट
दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेमुळे २००९ मध्ये श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. लाहोरमध्ये गद्दाफी मैदानावर जात असताना श्रीलंका संघाच्या बसवर १२ जणांनी गोळीबार केला होता. सुदैवाने यामध्ये कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत झाली नव्हती. हल्ल्यानंतर मैदानात हेलिकॉप्टर उतरवून श्रीलंकेच्या संघाला सुरक्षित ठिकाणी नेले होते. त्यानतंर जवळपास १० वर्षांहून अधिक काळ कोणत्याच संघाने पाकिस्तान दौरा केला नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.