मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तानची नाचक्की, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच गोलंदाजांची अशी धुलाई

पाकिस्तानची नाचक्की, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच गोलंदाजांची अशी धुलाई

रावळपिंडी कसोटीत पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर इंग्लंडचे फलंदाज तुटून पडले. इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.

रावळपिंडी कसोटीत पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर इंग्लंडचे फलंदाज तुटून पडले. इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.

रावळपिंडी कसोटीत पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर इंग्लंडचे फलंदाज तुटून पडले. इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

रावळपिंडी, 01 नोव्हेंबर : इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली. पहिल्या दिवशी फक्त 75 षटकांचा खेळ झाला तरी इंग्लंडने 506 धावा कुटल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. रावळपिंडीत सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 506 धावा केल्या आहेत.

पहिल्या दिवशी फक्त 75 षटकांचाच खेळ झाला. यामध्ये इंग्लंडच्या संघाने 6.74च्या सरासरीने धावा केल्या. यावरून त्यांच्या आक्रमक फलंदाजीचा आणि फटकेबाजीचा अंदाज लावला जाऊ शकतो. याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी 500 धावा झाल्या नव्हत्या. इंग्लंडकडून चार फलंदाजांनी शतके झळकावली.

हेही वाचा : BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या 'या' माजी क्रिकेटपटूंची वर्णी

याआधी 1910 मध्ये ऑस्ट्रेलियात सिडनीत झालेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवशी सर्वाधिक 494 धावा झाल्या होत्या. आता इंग्लंडने 500 पेक्षा जास्त धावा करून 112 वर्षे जुना विक्रम मोडला. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 2 फलंदाजांनी पहिल्या दिवशी शतक केलं होतं. कसोटी क्रिकेटची सुरुवात 145 वर्षांपूर्वी 1877 मध्ये झाली होती. आतापर्यंत पाचव्यांदा एका दिवसात 500 किंवा त्याहून जास्त धावा झाल्या आहेत. एका दिवशी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही इंग्लंडच्याच नावावर आहे. 1936 मध्ये मँचेस्टरवर झालेल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताविरोधात त्यांनी 588 धावा केल्या होत्या.

याशिवाय इंग्लडने 1924 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 522, श्रीलंकेने 2002 मध्ये बांगलादेशविरुद्ध 509, इंग्लंडने 1935 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 508 धावा केल्या होत्या. आता रावळपिंडीत पाकिस्तानविरुद्ध अशीच कामगिरी केली आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच एखाद्या संघाने कसोटीत एका दिवसात 500 धावा केल्या आहेत.

हेही वाचा : स्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान

इंग्लंडकडून जॅक क्रॉले याने 122, बेन डकेटने 107, ओली पोपने 108, हॅरी ब्रूकने नाबाद 101 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच चार फलंदाजांनी पहिल्या दिवशी शतक केलं. सामन्यात पाकिस्तानच्या 6 गोलंदाजांची धुलाई झाली. विशेष म्हणजे सहा गोलंदाजांनी 5.50 पेक्षा जास्त इकॉनॉमीने धावा दिल्या.

इंग्लंडचे फलंदाज आता एका डावात सर्वाधिक 5 फलंदाजांच्या शतकाचा विक्रम करू शकतात. ऑस्ट्रेलियाने 1955 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि पाकिस्तानने 2001 मध्ये बांगलादेशविरुद्ध अशी कामगिरी केली होती. कर्णधार बेन स्टोक्स 34 धावांवर नाबाद आहे.

इंग्लंड १ हजार धावा करणार का?

आता सर्वांची नजर यावर आहे की, इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 1 हजार धावापर्यंत पोहोचेल की नाही. आतापर्यंत फक्त दोन वेळा 900 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेने भारताविरोधात 1997 मध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली होती. त्यांनी 952 धावांचा डोंगर उभा केला होता. तर इंग्लंडने 1938मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 903 धावा केल्या होत्या.

First published:

Tags: Ben stokes, Cricket, England, Pakistan