मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

On This Day : जेव्हा 434 रन केल्यानंतरही झाला होता ऑस्ट्रेलियाचा पराभव!

On This Day : जेव्हा 434 रन केल्यानंतरही झाला होता ऑस्ट्रेलियाचा पराभव!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात आजच्या दिवशी 15 वर्षांपूर्वी (12 मार्च 2016) दिवशी झालेली लढत ही वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय लढत मानली जाते.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात आजच्या दिवशी 15 वर्षांपूर्वी (12 मार्च 2016) दिवशी झालेली लढत ही वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय लढत मानली जाते.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात आजच्या दिवशी 15 वर्षांपूर्वी (12 मार्च 2016) दिवशी झालेली लढत ही वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय लढत मानली जाते.

मुंबई, 12 मार्च : क्रिकेट इतिहासातील काही अविस्मरणीय लढती फॅन्स कधीही विसरणार नाहीत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात आजच्या दिवशी 15 वर्षांपूर्वी (12 मार्च 2016) दिवशी झालेली लढत ही वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय लढत मानली जाते. जोहान्सबर्गमधील वाँडर्स स्टेडियमवर झालेल्या या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाला 434 रन करुनही पराभव स्वीकारावा लागला होता.

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळ

या ऐतिहासिक मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिल्यांदा बॅटींग होती. तेव्हाच्या वर्ल्ड चॅम्पियन टीमने अत्यंत आक्रमक अशी सुरुवात केली होती. अ‍ॅडम गिलख्रिस्ट (55) आणि सायमन कॅटीच (79) यांनी पहिल्या विकेटसाठी 97 रनची पार्टरनरशिप केली. ही जोडी फुटल्यानंतर बॅटींगला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याने धावांचा वेग आणखी वाढवला.

ऑस्ट्रेलियाच्या तेव्हाच्या कॅप्टननं 105 बॉलमध्ये 164 रनची खेळी केली. त्यामध्ये 13 फोर आणि 9 सिक्सचा समावेश होता. माईक हसीने फक्त  51 बॉलमध्ये 81 रन काढले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ऑस्ट्रेलियाने 4 आऊट 434 असा विशाल स्कोअर केला.

गिब्ज-स्मिथच्या मनात वेगळेच होते

ऑस्ट्रेलियाची 434 ही तेव्हाच्या काळातील वन-डे क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सहज जिंकणार असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) आणि ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांच्या मनात वेगळेच होते. या जोडीने पहिली विकेट झटपट पडल्यानंतरही मोठ्या निर्धाराने खेळ केला.

स्मिथ-गिब्ज जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 187 रनची पार्टरनरशिप केली. स्मिथने फक्त 55 बॉलमध्ये 13 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 90 रन काढले. स्मिथ आऊट झाल्यानंतरही गिब्जचा आक्रमक खेळ सुरू होता. त्याने पाहता-पाहता शतक आणि नंतर दीडशतक झळकावले. गिब्जने 175 रनची विशाल खेळी केली. त्यामध्ये 21 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता.

स्मिथ आणि गिब्ज आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी विकेटकिपर - बॅट्समन मार्क बाऊचरनं शेवटपर्यंत खेळ करत टीमला एक बॉल बाकी असताना विजय मिळवून दिला. बाऊचरने नाबाद 50 रन काढत गिब्ज आणि स्मिथची मेहनत वाया जाऊ दिली नाही. हर्षल गिब्ज आणि रिकी पॉन्टिंग या दोघांनाही संयुक्तपणे 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

WI vs SL : पोलार्डने पकडला भन्नाट कॅच, सोशल मीडियावर VIDEO VIRAL )

ऑस्ट्रेलियाच्या टीमचा त्या काळात असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दरारा, T20 क्रिकेट सुरु होण्यापूर्वीचा काळ या सर्वांमुळे दक्षिण आफ्रिकेने केलेला 434 रनचा पाठलाग हा ऐतिहासिक मानला जातो. त्यामुळेच ही मॅच आजही सर्व क्रिकेट फॅन्सच्या चांगलीच लक्षात आहे.

First published:

Tags: Australia, Cricket, South africa