मुंबई, 11 मार्च : वेस्ट इंडिज (West Indies) क्रिकेट टीमचा वनडे आणि टी -20 मॅचेससाठी कॅप्टन असलेला कायरन पोलार्ड (Kieron Pollard) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कायरन पोलार्ड हा एक उत्तम बॅट्समन तर आहेच पण त्याचबरोबर तो एक चांगला फिल्डर देखील आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये (One Day Match) कायरन पोलार्डने हे सिध्द करुन दाखवलं आहे. अँटिग्वामध्ये खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये पोलार्डने श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेचा असा कॅच असा घेतला की, प्रेक्षक क्षणभर थबकलेच. कायरन पोलार्डने या सामन्यात झेप घेत कॅच पकडला. श्रीलंकेने या वनडे सामन्यात दमदार सुरुवात केली. धनुष्का गुणातिलका आणि दिमुथ करुणारत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी दमदार शतकी भागीदारी केली. ही जोडी तोडण्यासाठी 20 व्या ओव्हरला पोलार्ड बॉलिंगसाठी आला. त्यानंतर या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर पोलार्डनी जी कमाल केली, ती अगदी डोळे दिपवणारी होती. क्रिकेट जगतातला सगळ्यात वादग्रस्त आऊट, पोलार्डने काय केलं, पाहा VIDEO पोलार्डचा सुंदर कॅच कायरन पोलार्ड याने गुड लेंथ एरियात करुणारत्नेला बॉल टाकला. पोलार्डच्या उंचीमुळे बॉल प्रमाणापेक्षा जास्त उसळला आणि बॉल करुणारत्नेच्या बॅटच्या किनाऱ्याला लागला. त्यानंतर बॉल हवेत गेला परंतु पोलार्डपासून तो खूप दूर होता. असं असतानाही पोलार्डने उजवीकडे जात बॉल पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॉल त्याच्या हातातून निसटला तरीही त्याने त्यावर लक्ष केंद्रीत करत कॅच पकडला. पोलार्डचा हा कॅच घेतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.
पोलार्डने लगावले होते 6 बॉल्सवर 6 सिक्स कायरन पोलार्डने श्रीलंकेविरुद्ध टी20 सिरीजमध्ये 6 बॉल्सवर सलग 6 सिक्स लगावले होते. वेस्टइंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड याने टी20 मॅचमध्ये अखिला धनंजयच्या (Akila Dhananjay) 6 चेंडूंवर 6 सिक्स ठोकण्याचा विक्रम केला होता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा पोलार्ड हा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी भारताचा युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्जने (Harshal Gibbs) 6 बॉल्समध्ये 6 सिक्स ठोकले आहेत.