मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /भारताविरुद्ध चार बॉलमध्ये 4 विकेट्स, शतकही झळकावले तरी टीममध्ये संधी नाही

भारताविरुद्ध चार बॉलमध्ये 4 विकेट्स, शतकही झळकावले तरी टीममध्ये संधी नाही

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये (First Class Cricket) एखाद्या खेळाडूनं चार बॉलवर चार विकेट आणि शतह हा दुहेरी पराक्रम एकाच मॅचमध्ये करण्याची ही पहिलीच घटना होती.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये (First Class Cricket) एखाद्या खेळाडूनं चार बॉलवर चार विकेट आणि शतह हा दुहेरी पराक्रम एकाच मॅचमध्ये करण्याची ही पहिलीच घटना होती.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये (First Class Cricket) एखाद्या खेळाडूनं चार बॉलवर चार विकेट आणि शतह हा दुहेरी पराक्रम एकाच मॅचमध्ये करण्याची ही पहिलीच घटना होती.

मुंबई, 1 जुलै: भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India Tour of England) आहे.  या दौऱ्यात पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला एकही प्रॅक्टीस मॅच खेळायला मिळणार नाही. यापूर्वी ती परिस्थिती नव्हती. भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात नेहमी प्रॅक्टीस मॅचनं होत असे. आजच्या दिवशी म्हणजेच एक जुलै रोजी  (On This Day In Cricket) भारताविरुद्ध झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये इंग्लंडच्या खेळाडूनं एक जबरदस्त रेकॉर्ड केला होता.

टीम इंडिया 1996 साली इंग्लंड दौऱ्यावर गेली होती त्यावेळी हा रेकॉर्ड झाला होता. त्या दौऱ्यात 29 जून ते 1 जुलै दरम्यान साऊथप्टनमध्ये हॅम्पशायर टीमच्या विरुद्ध प्रॅक्टीस मॅच झाली होती. या मॅचमध्ये केवन जेम्स (Kevan James) याने सलग चार बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर शतकही झळकावले.

सचिन, द्रविडला केलं शून्यावर आऊट

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूनं चार बॉलवर चार विकेट आणि शतह हा दुहेरी पराक्रम एकाच मॅचमध्ये करण्याची ही पहिलीच घटना होती. या मॅचमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटींगचं निमंत्रण मिळाले होते. अजय जडेजा आणि विक्रम राठोड यांनी पहिल्या विकेटसाठी 192 रनची पार्टनरशिप केली. मात्र या दोघांनाही जेम्सनं शतक करु दिले नाही. जडेजा 91 तर राठोड़ 95 रनवर जेम्सच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानंतर भारताची इनिंग अचानक गडगडली. सचिन तेंडुलकर (0), राहुल द्रविड (0) आणि संजय मांजरेकर (0) हे पाठोपाठ आऊट झाले. 207 च्या स्कोअरवर टीम इंडियाने चार विकेट्स गमावल्या.

टीम इंडियाची अचानक पडझड झाल्यानंतरही सौरव गांगुलीनं एक बाजू लावून धरली. त्याने अनिल कुंबळे (59) पार्टनरशिप करत टीम इंडियाचा स्कोर 362 पर्यंत पोहचवला. गांगुलीनं नाबाद 100 रनची खेळी केली. जेम्सनं 74 रन देत 5 विकेट्स घेतल्या.

IND vs ENG: राहुल द्रविडचा खास शिष्य घेणार शुभमन गिलची जागा!

हॅम्पशायरकडून चौथ्या क्रमांकावर आलेल्या जेम्सनं 103 रनची खेळी केली. भारताविरुद्ध या रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतरही या ऑलराऊंडरची इंग्लंड टीममध्ये कधी निवड झाली नाही. जेम्सनं 225 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 30 पेक्षा जास्त सरासरीनं 8526 रन काढले. त्याने 10 शतक आणि 42 अर्धशतक झळकावले. जेम्सनं 254 लिस्ट A मॅचमध्ये 2459 रन काढले तसंच 247 विकेट्स घेतल्या.

First published:

Tags: Cricket, England, India, On this Day, Sachin tendulkar, Sports, Tour