जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: राहुल द्रविडचा खास शिष्य घेणार शुभमन गिलची जागा!

IND vs ENG: राहुल द्रविडचा खास शिष्य घेणार शुभमन गिलची जागा!

IND vs ENG: राहुल द्रविडचा खास शिष्य घेणार शुभमन गिलची जागा!

शुभमन गिल (Shumban Gill) दुखापतीग्रस्त असून तो संपूर्ण सीरिजमधून आऊट होऊ शकतो. त्यामुळे गिलच्या जागी श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) खास शिष्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जुलै : टीम इंडिया (Team India) 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाच टेस्ट मॅचची सीरिज (India vs England) खेळणार आहे. ही सीरिज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल (Shumban Gill) दुखापतीग्रस्त असून तो संपूर्ण सीरिजमधून आऊट होऊ शकतो. त्यामुळे गिलच्या जागी श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) खास शिष्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. बंगालचा ओपनिंग बॅट्समन अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Easwaran) हा इंग्लंड दौऱ्यावर स्टँडबाय म्हणून गेला आहे. गिल या सीरिजमधून आऊट झाल्यास त्याची टीम इंडियात निवड होऊ शकते. राहुल द्रविड हा अभिमन्यूचा ‘आयडॉल’ आहे. ‘स्पोर्ट्स यारी’ शी बातचित करताना त्याने सांगितले होते की, “मी लहानपणी राहुल सरांच्या बॅटींगची वाट पाहत असे. ते माझी प्रेरणा आहेत. इंडिया ए टीममध्ये माझी निवड झाली तेव्हा ते कोच होते. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, हे माझं भाग्य आहे.” आयपीएलमध्ये निराशा यावर्षी झालेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction 2021) कोणत्याही टीमनं खरेदी न केल्यानं अभिमन्यू निराश झाला होता. मात्र त्यानंतर त्याची थेट इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. मला विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांकडून बरंच काही शिकता येईल, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती. सर्व प्रकारात यशस्वी अभिमन्यू गेल्या काही काळापासून इंडिया ए टीमचा सदस्य आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 48.72 आहे. लिस्ट A क्रिकेटमध्येही त्याने 43 पेक्षा जास्त सरासरीनं रन काढले आहेत. बंगालच्या या बॅट्समननं अनेक दिग्गजांना प्रभावित केले आहे. या दोन खेळाडूंना मिळाली नशिबाची साथ, विराट कोणाला संधी देणार? अभिमन्यूनं 2018-19 साली झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत फक्त 6 मॅचमध्ये 861 रन काढले होते. तो देवधर ट्रॉफी आणि दुलिप ट्रॉफी स्पर्धेत देखील खेळला आहे. दुलिप ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने 153 रनची खेळी केली होती. त्यानंतर त्याची इंडिया ए मध्ये निवड झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात