• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • On This Day : 6,6,6,6 ब्रेथवेटच्या सलग चार सिक्स नंतर रडला होता बेन स्टोक्स!

On This Day : 6,6,6,6 ब्रेथवेटच्या सलग चार सिक्स नंतर रडला होता बेन स्टोक्स!

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (West Indies vs England) यांच्यात झालेली ती फायनल अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. शेवटच्या ओव्हरमध्ये कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) याने सलग चार सिक्स लगावत वेस्ट इंडिजच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

 • Share this:
  मुंबई, 3 एप्रिल : कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (3 एप्रिल 2016) सहाव्या टी 20 वर्ल्ड कपची फायनल मॅच झाली. वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (West Indies vs England) यांच्यात झालेली ती फायनल अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगली.  शेवटच्या ओव्हरमध्ये कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) याने सलग चार सिक्स लगावत वेस्ट इंडिजच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. फायनल मॅचमध्ये इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करताना जो रुटच्या (Joe Root) अर्धशतकाच्या (54) जोरावर 9 आऊट 155 रन काढले होते. फायनलच्या दबावाचा विचार करता तो चांगला स्कोअर होता. 156 रनचा पाठलाग करताना 14 व्या ओव्हरनंतर वेस्ट इंडिजचे फक्त 70 रन झाले होते. वेस्ट इंडिजसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं होतं. पण त्यांच्या सुदैवानं आणि इंग्लंडच्या दुर्दैवानं मार्लन सॅम्युअल्स (Marlon Samuels) मैदानात होता. सॅम्युअल्सनं 2012 साली झालेल्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजला  टी20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. त्याला यापूर्वीच्या फायनलचा अनुभव होता.  सॅम्युअल्सचा हा अनुभव वेस्ट इंडिजच्या उपयोगाला आला. वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी आऊट झाल्यानंतर कार्लोस ब्रॅथवेट मैदानात उतरला. त्यावेळी वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 27 बॉलमध्ये 49 रनची गरज होती. सॅम्युअल्स - ब्रॅथवेट जोडीनं पुढील 21 बॉलमध्ये 30 रनची पार्टरनरशिप केली. त्यामुळे आता वेस्ट इंडिजला विजेतेपद पटकावण्यासाठी शेवटच्या सहा बॉलमध्ये 19 रन हवे होते. Remember the name इंग्लंडकडून शेवटची ओव्हर टाकण्यासाठी बेन स्टोक्स (Ben Stokes) आला. त्याच्या समोर त्यावेळी नवा असलेला कार्लोस ब्रॅथवेट उभा होता. ब्रॅथवेटनं त्यानंतर  पहिल्या चार बॉलवर सलग चार सिक्स (6,6,6,6) खेचत वेस्ट इंडिजला विजेतेपद मिळवून दिले. ब्रेथवेटच्या चौथ्या सिक्सनंतर  ‘Carlos Brathwaite, remember the name’  हे इयन बिशप यांच्या आवाजातील ते शब्द आजही क्रिकेट फॅन्सच्या लक्षात आहे. ( On This Day : धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि कधीही न विसरता येणारी 'ती' रात्र ) बेन स्टोक्ससाठी तो मोठा धक्का होता. त्याला मैदानात अश्रू लपवता आले नाहीत. त्याच्या चार खराब बॉलमुळे इंग्लंडच्या हातामधून वर्ल्ड कप निसटला होता. या सर्वात खराब प्रसंगानंतर बेन स्टोक्सनं जिद्दीनं कमबॅक केलं. त्यानंतर चार वर्षांनी 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये बेन स्टोक्स हाच इंग्लंडच्या पहिल्या वाहिल्या वर्ल्ड कप विजेतेपदाचा शिल्पकार होता.
  Published by:News18 Desk
  First published: