Home /News /sport /

On This Day : डीव्हिलियर्सनं एका पायावर खेळून काढले होते 146 रन!

On This Day : डीव्हिलियर्सनं एका पायावर खेळून काढले होते 146 रन!

आजच्या दिवशी 2007 साली (On This Day) एबी डीव्हिलियर्सनं (AB de Villiers) वर्ल्ड कपमध्ये एक जबरदस्त खेळी केली होती. जी आजही सर्वांच्या लक्षात आहे.

    मुंबई, 10 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) आता सुरुवात झाली आहे. या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) एबी. डीव्हिलियर्स (AB de Villiers) हे मुख्य आकर्षण आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि आक्रमक बॅट्समन असलेल्या डीव्हिलियर्सनं आयपीएलमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. त्याचबरोबर त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द देखील तितकीच जबरदस्त आहे. आजच्या दिवशी 2007 साली (On This Day) डीव्हिलियर्सनं वर्ल्ड कपमध्ये एक जबरदस्त खेळी केली  होती. जी आजही सर्वांच्या लक्षात आहे. वेस्ट इंडिजमध्ये 2007 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2007) दक्षिण आफ्रिकेनं डीव्हिलियर्सचा वापर  एक फ्लोटर म्हणून केला होता. 10 एप्रिल 2007 रोजी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या लढतीपूर्वी त्यानं वर्ल्ड कपमध्ये 0, 62, 92, 0, 0 आणि 15 असे रन काढले होते. त्याला वर्ल्ड कपमधील पहिलं शतक झळकावण्यात काही यश आलं नव्हतं. कॅलिससोबत जोडी जमली वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या त्या मॅचमध्ये ब्रायन लारा (Brian Lara) याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन ग्रॅमी स्मिथसोबत डीव्हिलयर्स त्या मॅचमध्ये ओपनिंगला आला होता. स्मिथ फक्त 7 रन काढून आऊट झाला. त्यानंतर आलेल्या जॅक कॅलिससोबत डीव्हिलियर्सची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 170 रनची पार्टरनरशिप केली. दक्षिण आफ्रिकेनं 35 व्या ओव्हरमध्ये 190 रन केले होते. कॅलिसची शतकाकडं सुरु असलेली वाटचाल ख्रिस गेलनं रोखली. त्यानं कॅलिसला 81 रनवर आऊट केलं. कॅलिस आऊट झाल्यानंतर डीव्हिलियर्सनं त्याचं वर्ल्ड कपमधील पहिलं शतक पूर्ण केलं. त्यानं हे शतक पूर्ण करण्यासाठी 114 बॉल घेतले. पाय दुखावला तरी... डीव्हिलियर्सनं शतक झळकावल्यानंतर त्याचा उजवा पाय दुखावला. त्यामुळे ग्रॅमी स्मिथ त्याचा रनर म्हणून आला. डीव्हिलियर्सचा पाय दुखावला आहे. त्यामुळे त्याला फुटवर्कचा वापर करता येणार नाही. हे लक्षात घेऊन लारानं त्याच्या विरोधात रामनरेश सरवान या स्पिनरला बॉलिंग दिली. लाराच्या दुर्दैवानं डीव्हिलियर्सनं त्यावेळी आक्रमण करण्याचं ठरवलं होतं. त्यानं सरवानच्या त्या ओव्हरमध्ये दोन सिक्स आणि एक फोर लगावला. त्यानंतर ब्राव्होला एक्स्ट्रा कव्हरवरुन सिक्स मारताना डीव्हिलियर्स अक्षरश: पडला. पण तरी त्यानं तो सिक्स लगावला. अखेर पुढच्या ओव्हरमध्ये तो 146 रन काढून आऊट झाला. शतक झळकावण्यासाठी 114 बॉल घेणाऱ्या डीव्हिलियर्सनं पुढचे 46 रन काढण्यासाठी फक्त 16 बॉल घेतले होते. (On This Day: 15 वर्षांच्या करियरमध्ये 'या' खेळाडूनं पहिल्यांदाच वापरलं हेल्मेट ) दक्षिण आफ्रिका विजयी डीव्हिलियर्सच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजसमोर 357 रनचं टार्गेट ठेवलं. ब्रायन लाराच्या टीमला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांचा 67 रननं मोठा पराभव झाला. एका पायावर 146 रनची जिगरबाज खेळी करणाऱ्या डीव्हिलियर्सला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, On this Day, South africa, West indies

    पुढील बातम्या