मुंबई, 27 जून : यंदा भारतात आयोजित केल्याजाणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड कप सामने भारतातील विविध शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. तर या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारत पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमने सामने येणार आहेत. आयसीसी वर्ल्ड कप 2023 ही बहुप्रतीक्षित स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार असून मुंबई आणि कोलकाता येथे सेमी फायनल सामने खेळवले जाणार आहेत.5 ऑक्टोबर रोजी पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार असून हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर टीम इंडिया देखील ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारा पहिला सामना देखील अहमदाबादमधेच होणार आहे. जय शहा यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार असून एकूण 10 संघ या स्पर्धेत उतरत आहेत. स्पर्धेसाठी यासाठी 8 संघ पात्र ठरले असून उर्वरित 2 संघांबाबतचा निर्णय पात्रता फेरीतून होईल. आयसीसी वर्ल्ड कप 2023 भारतातील 10 ठिकाणांवर खेळवले जाणार असून यामध्ये अहमदाबाद, हैदराबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. तर पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.
भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने : आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर १५ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारताचे आयसीसी वर्ल्ड कप 2023मधील सामने : 8 ऑक्टोबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई 11 ऑक्टोबर - विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली 15 ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद 19 ऑक्टोबर - विरुद्ध बांगलादेश, पुणे 22 ऑक्टोबर - विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाळा 29 ऑक्टोबर - विरुद्ध इंग्लंड, लखनऊ 2 नोव्हेंबर - विरुद्ध क्वालिफायर 2, मुंबई 5 नोव्हेंबर - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता 1 नोव्हेंबर - विरुद्ध क्वालिफायर 1, बंगळुरू