मुंबई, 20 जानेवारी : भारतातील ओडिशामध्ये यंदा पुरुष हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा खेळली जात आहे. गुरुवारी भारत विरुद्ध वेल्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात भारताने वेल्सवर 4-2 ने आघाडी मिळवत मात केली. परंतु भारतीय हॉकी संघ थेट वर्ल्ड कप क्वाटर फायनल गाठण्यास अपयशी ठरला. भारताने ग्रुप ड मध्ये असलेल्या इंग्लंड सोबत 7 अंकांची बरोबरी केली. परंतु गोल संख्येत भारत इंग्लंडपेक्षा मागे पडला. त्यामुळे आता भारताला क्वार्टर फ़ाइनल गाठण्यासाठी न्यूझीलंड सोबत क्रॉस ओव्हर मॅच खेळून ती जिंकावी लागणार आहे.
दबावाखाली खेळताना नैसर्गिक कामगिरी करता येत नाही हे भारतीय प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी संघाला सामन्यापूर्वी खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. ग्रॅहम यांचा असा विश्वास होता की असे केल्याने परिणाम स्वतःच प्राप्त होईल. परंतु ऐन सामन्यात गटात इंग्लंडला पिछाडीवर टाकून आठ गोलच्या फरकाने विजय मिळवण्याचे दडपण भारतीय संघ पेलू शकला नाही.
हे ही वाचा : द्रविडच्या मुलांचे वडिलांच्या पावलावर पाऊल, लहानगा बनला कॅप्टन, मोठ्याने केलंय द्विशतक
वेल्स विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या आक्रमणात सुरुवातीपासूनच प्रभाव दिसून आला नाही. यामुळे, बहुतेक वेळा चेंडूवर ताबा असूनही, भारतीय संघ वेल्सवर हल्ले घडवून शकला नाही ज्यामुळे अपेक्षित गोल करणे भारतीय संघाला अशक्य झाले. अखेर भारतीय संघाने 4-2अशा फरकात सामना जिंकला असला तरी देखील आता क्वाटर फायनल मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे. न्यूझीलंड संघ सध्या ग्रुप क मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
22 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात क्रॉस ओव्हर मॅच खेळवली जाणार आहे. हा सामना भुवनेश्वर येथील स्टेडियमवर खेळवला जाणार असून सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना पाहता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.