मुंबई, 4 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक किर्गियोस नेहमीच त्याच्या आक्रमकतेमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतो. टेनिस विश्वातील 'बॅड बॉय' अशी प्रतिमा असलेला निक किर्गियोस पुन्हा एकदा त्याच्या कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. किर्गियोसने आपल्याला त्याच्या कारमधून रस्त्यावर फेकत प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केला आहे.
निक किर्गियोस आणि एक्स गर्लफ्रेंड चियारा पासारी हे दोघे एकमेकांना डेट करीत होते. परंतु 2021 साली किर्गियोस आणि चियारा यांच्यात झालेल्या वादानंतर किर्गियोसने आपल्याला कारमधून रस्त्यावर फेकल्याचा आरोप गर्लफ्रेंडने केला. तसेच किर्गियोसने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा देखील आरोप करत एक्स गर्लफ्रेंड चियाराने घटनेच्या 10 महिन्यांनंतर पोलिसांत तक्रार केली होती.
एक्स गर्लफ्रेंड चियारा पासारीने दाखल केलेल्या तक्रारी प्रकरणी 27 वर्षीय टेनिसपटू किर्गियोसला गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. यावेळी त्याच्यासोबत त्याची सध्याची गर्लफ्रेंड कोस्टीन हातजी, भाऊ आणि आईही न्यायालयात पोहोचले. टेनिसपटू सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. मानसिक आरोग्याचे कारण देत त्याने न्यायालयाकडे वेळ मागितला होता, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. किर्गियोसने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Sports, Tennis player