मुंबई, 4 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ नागपूर येथे दाखल झाला आहे. नागपूर येथील विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार असून यासाठी सध्या भारतीय संघ सरावात मग्न आहे. दरम्यान भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
9 फेब्रुवारी पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय कसोटी संघ न्यूझीलंड विरुद्धची टी 20 मालिका जिंकल्यावर नागपूर येथे दाखल झाला. यावेळी नागपूर येथील हॉटेलमध्ये भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिला कर्मचारी सर्व खेळाडूंचे हिंदू संस्कृतीनुसार कपाळावर टिळा लावून स्वागत करीत होती. परंतु यावेळी मोहम्मद सिराज, उमरान मलिक सह संघाच्या सपोर्ट स्टाफपैकी काही लोकांनी कपाळावर गंध लावून घेण्यास नकार दिला. मोहम्मद सिराज आणि उमरान यांनी मुस्लीम असल्यानेच त्यांनी गंध लावून घेतला नाही अशी भावना व्यक्त होत असून यावर नेटकरी संतापले आहेत.
Md Siraj & Umar Malik didn’t get the tilak but our guys go and put chadar in majhar pic.twitter.com/7XK4s2vfuN
— Boiled Anda (@AmitLeliSlayer) February 3, 2023
हॉटेलमध्ये प्रवेश करताना 11 पैकी 4 जणांनी टिळक लावण्यास नकार दिल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांच्याशिवाय विक्रम राठौर आणि सपोर्ट स्टाफच्या एका सदस्याचा यात समावेश आहे. यानंतर अनेकजण सिराज-उमरानवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही जण ते त्यांच्या धर्माशी कट्टर राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक देखील करीत आहेत.
गेल्या वर्षभरात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सिराजची कामगिरी अप्रतिम राहिली असून अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेतही त्यांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. दुसरीकडे, उमरान मलिक 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. भारतीय संघातही त्याला सातत्याने संधी मिळत आहेत. या दोघांकडूनही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Nagpur, Team india, Test cricket