मुंबई, 19 ऑगस्ट : पाकिस्तानचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) कब्जा केला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधली परिस्थिती चिघळली आहे. तालिबानने कब्जा केल्यानंतर अनेक अफगाणी नागरिक देश सोडून जात आहेत, यातच आता न्यूझीलंड क्रिकेट टीमचा पाकिस्तान (Pakistan vs New Zealand) दौरा अडचणीत आला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे अधिकारी पुढच्या महिन्यात होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यासाठीच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत.
न्यूझीलंडची टीम 18 वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करायला तयार झाली आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि पाच टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. 17 सप्टेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे, तर 3 ऑक्टोबरला शेवटची मॅच होईल. रावळपिंडी आणि लाहोरमध्ये सगळे सामने खेळवले जातील. आम्हाला न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशन आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डावर विश्वास आहे, ते पाकिस्तानमधल्या सुरक्षेची पाहणी करतील. तिकडे काय होत आहे, हे प्रत्येक जण पाहत असेल, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा खेळाडू टॉड एस्टलने दिली.
पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यासाठी सगळ्या खेळाडूंनी मनापासून मंजुरी दिली आहे का? असा सवाल माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीच्या ग्लेन टर्नर यांनी उपस्थित केला. 'खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तान दौऱ्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती खराब आहे, त्यापेक्षा अफगाणिस्तानमधली परिस्थिती मोठा घटनाक्रम आहे,' असं टर्नर म्हणाले.
न्यूझीलंडला पाकिस्तान दौऱ्याआधी बांगलादेशविरुद्धही टी-20 सीरिज खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर न्यूझीलंड टीमचा हा पहिला दौरा आहे. यासाठी सगळ्या खेळाडूंना कोरोना लस देण्यात येणार आहे. तसंच मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि बायो-बबलमध्ये राहणं खेळाडूंना बंधनकारक आहे. चार्टर विमानाने न्यूझीलंडचे खेळाडू बांगलादेशला रवाना होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Cricket, New zealand, Pakistan, Taliban