प्राणीसंग्रहालयात पर्यटकांसोबत अस्वल खेळला लपाछुपी, VIDEO पाहून तुम्हीही हसाल

प्राणीसंग्रहालयात पर्यटकांसोबत अस्वल खेळला लपाछुपी, VIDEO पाहून तुम्हीही हसाल

अस्वलाला असे खेळताना तुम्ही कधीच पाहिले नसेल. हा VIDEO मिस करू नका.

  • Share this:

मेक्सिको, 28 नोव्हेंबर : प्राणीसंग्रहालयात पर्यटक प्राण्यांसोबत फोटो काढण्यासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी जातात. मात्र कधी कोणत्या प्राण्याला पर्यटकांसोबत खेळताना पाहिले आहे? मात्र मेक्सिकोच्या प्राणिसंग्रहालयात अशी घटना घडली. मेक्सिकोच्या प्राणीसंग्रहालयातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

मेक्सिकोच्या या इकोलॉजिकल पार्कमध्ये दोन अस्वल फिरताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यात एका अस्वलाने चक्क पर्यटक असलेल्या एका महिलेच्या बाजूला उभे राहून तिचे केस ओढले. अस्वल हल्ला करत आहे, या भीतीनं ही महिला जागेवरून हल्लीही नाही. सर्वच पर्यटकांना वाटले की अस्वल या महिलेवर आक्रमण करण्यासाठी येत आहे, पण अस्वल त्या महिलेच्या केसांना स्पर्श करून निघून गेला. जणू हे अस्वल महिलेच्या मागे उभे राहून लपाछुपी खेळत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वाचा-एका सेकंदात मुंगसानं मृत्यूला दिली मात; थरारक VIDEO VIRAL

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, मेक्सिकोच्या प्राणिसंग्रहालयात पर्यटकांचा एक गट उद्यानात फिरताना दिसत आहे. तेवढ्यात, चालत असताना दोन अस्वल आले. त्यातील एक अस्वल पर्यटकांकडे आला. लोक अस्वलाकडे पहात तिथे उभे होते त्यावेळी एक अस्वल या महिलेच्या पायावर उभा राहिला आणि मागे लपला. मागे लपून महिलेच्या केसांना स्पर्श करू लागला. या सगळ्या प्रकारावर इतर पर्यटक हसू लागले त्यानंतर अस्वल खाली आला आणि तेथून निघून गेला. हा 58 सेकंदाचा व्हिडिओ YouTube वर अपलोड करण्यात आला आहे.

वाचा-अचानक घरात घुसला बिबट्या आणि कपाटावर चढून बसला; नगरजवळच्या घटनेचा थरार

वाचा-अवघ्या 30 सेंकदात 22 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; पाहा LIVE व्हिडिओ

23 नोव्हेंबर रोजी अपलोड झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 2 लाख लोकांनी पाहिले आहे. लोकांनी या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने यावर, “अस्वल आक्रमक नसतात. जेव्हा त्यांच्यावर प्रेम दर्शविले जाते तेव्हा ते खूपच गोंडस असतात". तर, दुसर्‍या वापरकर्त्याने,"ती माझ्या काळ्या मांजरीसारखी आहे. माझ्या शेजारी पलंगावर बसून, ती माझ्याकडे येईल आणि माझ्या हाताला स्पर्श करेल आणि मला सांगेल की तिच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.''. दरम्यान हा व्हिडीओ कोणी काढला हे अद्याप कळू शकलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2019 02:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading