मेक्सिको सिटी, 28 नोव्हेंबर : आजकाल लग्नांमध्ये ग्रॅण्ड एण्ट्री करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळं अगदी एका बॉलीवूड सिनेमालाही लाजवेल, अशी वरात लग्नात काढली जाते. मात्र कोणता नवरदेव आकाशातून आपल्या बायकोसाठीला आहे, असा प्रकार पाहिला आहे? नाही ना! मात्र असा प्रकार एका नादखुळ्या भारतीयानं केला आहे. मेक्सिकोमध्ये हा नवरदेव थेट स्काय डाईव्ह करत लग्न मंडपात पोहचला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शेरवानी आणि फेटा बांधत या नवरदेवानं थेट ढगातून मंडपात दाखल झालेला दिसत आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या वेडिंग फोटोग्राफर जोहैब अलीनं या ग्रॅंड एण्ट्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. या व्हिडीओवर मजेदार कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ आहे मेक्सिको येशील लॉस कोबोस शहरा जवळचा. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नवरदेवानं आपल्या या अनोख्या स्काय डायव्हिंगचा अनुभव सांगितला. आकाश असे या नवरदेवाचे नाव असून, त्यानं आपल्या या भन्नाट प्लॅन मागची गोष्ट सांगितले. आकाशनं. “लग्न मंडपात येताना ग्रॅंड काहीतरी करायचे माझ्या डोक्यात होतेच. मी सुरुवातील कुटुंबासोबत बोटीनं येणार होतो. मात्र काही कारणास्तव ते करता आले नाही. म्हणून मी थेट हवेतून यायचा विचार केला”, असे सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे आकाशनं यासाठी 2 दिवस सरावही केला होता. दरम्यान स्काय डाईव्ह करण्याआधी वादाळाची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र आकाशनं आपला निर्णय मागे घेतला नाही. जेव्हा आकाश स्काय डाईव्ह करत आकाशातून लग्न मंडपात येत होते, तेव्हा खाली 500हून अधिक पाहुणे त्याच्या स्वागतासाठी उभे होते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर काही मुलांनी आता मुलींच्या अपेक्षा वाढतील, अशाही कमेंट्स केल्या आहेत.

)







