मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दहा वर्ष मैदान गाजवलेली राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू बनली प्लंबर!

दहा वर्ष मैदान गाजवलेली राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू बनली प्लंबर!

गोव्यातील ख्रिस्टी डायस या 28 वर्षांच्या व्हॉलीबॉलपटू (Volleyball player) उपजिवेकेसाठी चक्क प्लंबर (Plumber) बनल्या आहेत. डायस यांनी तब्बल 10 वर्षे राष्ट्रीय स्तरावर गोव्याचं प्रतिनिधित्व केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 मार्च : आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी त्या खेळाडूंची रोजी रोटीची चिंता कशी मिटेल याची काळजी सर्वात प्रथम घेतली पाहिजे. भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक खेळाडू तयार होतात, त्यांच्यासाठी योजनाही जाहीर केल्या जातात. मात्र काही जणांपर्यंत त्या पोहचत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना खेळाचं मैदान सोडून दुसरं काम करावं लागतं. गोव्यातील ख्रिस्टी डायस या 28 वर्षांच्या व्हॉलीबॉलपटू (Volleyball player) उपजिवेकेसाठी चक्क प्लंबर (Plumber) बनल्या आहेत.

'पुढारी' ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, डायस यांनी 2008 ते 2018 अशी तब्बल दहा वर्ष गोव्याचं राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बंगळुरुतून व्हॉलिबॉल प्रशिक्षकाचा (volleyball coach) डिप्लोमा पूर्ण केला. त्याचबरोबर पुण्यातून शारीरिक शिक्षण शिक्षकाची (Physical education teacher) पदवी देखील घेतली. व्हॉलीबॉल खेळता यावं म्हणून त्यांनी सरकारी कोट्यातून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कोणतीही सरकारी किंवा खासगी नोकरी मिळाली नाही.

या परिस्थितीमध्ये घर चालवण्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी प्लंबिंगची कामं घेण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला मुंबईतील एका प्लंबरच्या मदतीने त्यांनी ही कामं केली. त्यानंतर आता त्या स्वतंत्रपणे हे काम करतात. 'सुरुवातीला एक महिला प्लंबर काम काय करणार?' असा प्रश्न अनेकांना पडत असे. त्यांनी माझ्या क्षमतेवर देखील शंका उपस्थित केली होती. मात्र माझं काम बघून त्यांचा विश्वास बसला आणि इतर कामं मिळू लागली,' असा अनुभव डायस यांनी सांगितला आहे.

( वाचा : लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी जाणून घ्या हा क्रिकेटपटू किती कमावतो, कुठे राहतो? )

कोणतंही काम लहान नसतं. आयुष्यात मिळालेलं काम प्रामाणिकपणे करुन पुढे गेलं पाहिजे. या विषयावर लोकांनी काहीही बोललं तरी त्यांचं बोलणं मी मनावर घेत नाही, असं डायस यांनी सांगितलं. 2019 साली राष्ट्रीय खेळात होणाऱ्या बीच व्हॉलीबॉल स्पर्धेत त्या सहभागी होणार होत्या. मात्र कोरोनामुळे ती स्पर्धा रद्द झाली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Goa, Sports