Home /News /lifestyle /

लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी जाणून घ्या जसप्रीत बुमराह किती कमावतो... क्रिकेटपटूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी!

लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी जाणून घ्या जसप्रीत बुमराह किती कमावतो... क्रिकेटपटूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी!

मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची नेट वर्थ, वैयक्तिक जीवन आणि आयपीएलमधली कमाई या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्या...

मुंबई, 10 मार्च: भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्याच्या वेगवान बॉल्समुळे नव्हे तर काही खास वैयक्तिक कारणांमुळे जास्त चर्चेत आहे. बुमराहचं लग्न ठरलंय हे बातमी एव्हाना वाऱ्यासारखी पसरली आहे. बुमराहने इंग्लंड (India vs England) दौऱ्यातून 'वैयक्तिक कारणांसाठी' माघार घेतली आणि बातमी फुटली. आता बुमराह कोणाशी लग्न करतोय (Who is bumrah girlfried), त्याची होणारी बायको काय काम करते (Who is japsprit bumrah wife), बुमराहचं लग्न कुठे होणार याचीच नाही तर बुमराह किती कमावतो त्याचं उत्पन्न (Jasprit Bumrah net worth) किती याबाबतही फॅन्सना उत्सुकता आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या वृत्तानुसार बुमराहने (Jasprit Bumrah Marriage) लग्न करण्यासाठी ब्रेक घेतला आहे. 14 आणि 15 मार्चला गोव्यात स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) बुमराहचं लग्न होईल. या दोघांच्या लग्नाचा चर्चा सुरू असतानाच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोण आहे संजना गणेशन? संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. तसंच ती कोलकाता नाईट रायर्डस या आयपीएलच्या टीमसाठीही एँकरिंग करते. संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता. पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती.

बुमराहचं वैयक्तिक उत्पन्न किती? (Jasprit Bumrah Net Worth)

गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात उत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या भारतीय वेगवान गोलंदाजाचं नाव गणलं जाऊ लागलं आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून (Limited Overs Cricket) त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरुवात केली असली, तरी कसोटी क्रिकेटमध्येही त्याने चांगलं नाव कमावलं आहे. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बॅट्समन ज्यांच्या बॉलिंगसमोर कचरतात, अशा बॉलर्समध्ये त्याचा समावेश होतो. त्याच्या उत्पन्नाबद्दल वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या काही गोष्टींबद्दल 'रिपब्लिक वर्ल्ड'ने माहिती दिली आहे. जसप्रीत बुमराहची नेट वर्थ म्हणजे त्याचं उत्पन्न 'सीए नॉलेज'कडून मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहची नेट वर्थ (Net Worth) सुमारे 29 कोटी रुपये आहे. क्रिकेटमधून तो उत्पन्न मिळवतोच. त्याशिवाय अनेक ब्रँड्सची एंडोर्समेंट करण्यातून, तसंच जाहिरातींतूनही त्याला पैसे मिळतात. ड्रीम 11, कल्टस्पोर्ट, एस्ट्रोलो इत्यादी जाहिरातींत तो झळकला आहे. 'फोर्ब्ज इंडिया'च्या म्हणण्यानुसार जसप्रीत बुमराहने 2019मध्ये 23.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.
IPL मधील कमाई जसप्रीत बुमराहने ड्रीम 11 आयपीएलच्या त्या संपूर्ण करिअरमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2013मध्ये तो पहिल्यांदा या संघासाठी खेळला. 'मनीबॉल'च्या माहितीनुसार, पहिल्या हंगामात त्याला 10 लाख रुपये मानधन मिळालं. पदार्पणातल्या उत्तम कामगिरीमुळे त्याने सर्वांवर प्रभाव टाकला. 2014पासून त्याचं मानधन वाढवून ते थेट 1.2 कोटी रुपये करण्यात आलं. ते 2017पर्यंत तेवढंच होतं. एकदिवसीय क्रिकेट, कसोटी आणि आयपीएल अशा तिन्ही प्रकारांता स्वतःला सिद्ध केल्यानंतर आता मुंबई इंडियन्स संघाकडून त्याला आयपीएलच्या (IPL) प्रत्येक हंगामासाठी सात कोटी रुपये मानधन मिळतं.  हे वाचा -  PHOTO: रोहित, युवराजच्याही पूर्वीच्या टीम इंडियाच्या ओरिजनल Sixer King ला ओळखले का? वैयक्तिक आयुष्य
View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

सहा डिसेंबर 1993 रोजी जसप्रीतचा जन्म झाला. दुर्दैवाने तो लहान असतानाच त्याचे वडील गेले आणि त्याची आई आणि बहिणीने त्याला वाढवलं. त्या दोघी आणि त्याचे लहान वयातले प्रशिक्षक किशोर त्रिवेदी यांचा आपल्या जडणघडणीमध्ये किती महत्त्वाचा सहभाग आहे, याबद्दल जसप्रीतने मागे एकदा सांगितलं होतं. 2012मध्ये तो गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचा. 2016मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर तो लवकरच तिन्ही प्रकारांत टीमचा अविभाज्य भाग बनला. त्याची बॉलिंग फास्ट असली, तरी त्याचा स्वभाव मात्र शांत आहे. सोशल मीडियावर तो फोटो शेअर करत असतो.
First published:

Tags: Cricket, IPL 2021, Jasprit bumrah

पुढील बातम्या