मुंबई, 16 सप्टेंबर : जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही यावर आहे. दुसरीकडे धोनी टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघात असणार की नाही, याबाबत वेगळ्या चर्चा होत आहेत. मात्र आता धोनी आयपीएल 2020मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे. धोनीनं वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरोधात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर धोनी तब्बल 2 महिने क्रिकेटपासून लांब आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही टी-20 मालिकांसाठी धोनीची संघात निवड करण्यात आली नाही. दरम्यान धोनी दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यावेळी धोनीला संघात जागा मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्यात धोनीच्या आयपीएल करिअरबाबत एक मोठी बातमी आली आहे. धोनीनं चेन्नई सुपरकिंग्ज संघाला तीन वेळा मिळवून दिला किताब आयपीएलमधील संघ चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. धोनीनं कर्णधार म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज संघाला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळं येत्या आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर सीएसकेचे मालक श्रीनिवासन यांनी मोठा खुलासा केला आहे. श्रीनिवासन यांनी धोनीच पुढच्या हंगामात कर्णधार असल्याचे स्पष्ट केले आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत धोनी आयपीएलच्या हा हंगाम खेळणार असल्याचे सांगितले. वाचा- The Ashes : वाद काही संपेना! LIVE सामन्यात बेन स्टोक्सनं वॉर्नरला घातल्या शिव्या 8वेळा फायनलमध्ये चेन्नईनं केला प्रवेश स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघावर बंदी घालण्यात आली. दरम्यान बंदी हटवल्यानंतर चेन्नई संघानं 2018मध्ये तब्बल तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब मिळवला. तर, 2019मध्ये मुंबई इंडियन्स विरोधात फायनलमध्ये पोहचली. धोनीच्या नेतृत्वाखाली 12 हंगामात चेन्नईनं आठवेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. वाचा- ‘माझं यश त्यांनी पाहिलंच नाही’, वडिलांच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी रडला रोनाल्डो 27 फेब्रुवारीमध्ये खेळला अखेरचा टी-20 सामना महत्त्वाची बाब म्हणजे धोनीनं शेवटचा टी-20 सामना 27 फेब्रुवारी 2019मध्ये खएळला होता. ऑस्ट्रेलिया विरोधात बंगळूरूमध्ये हा सामना झाला होता. या सामन्यात धोनीनं आक्रमक फलंदाजी करत 23 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. दरम्यान या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. वाचा- अफगाणिस्तानचा विश्वविक्रम, स्वत:लाच मागे टाकून रचला अनोखा इतिहास VIDEO: आज दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.