अफगाणिस्तानचा विश्वविक्रम, स्वत:लाच मागे टाकून रचला अनोखा इतिहास

अफगाणिस्तानचा विश्वविक्रम, स्वत:लाच मागे टाकून रचला अनोखा इतिहास

ऑस्ट्रेलियानेसुद्धा टी20 मध्ये सलग सर्वाधिक 12 सामने न गमावता खेळण्याचा विक्रम केला असला तरी अफगाणिस्तानने बाजी मारली.

  • Share this:

ढाका, 16 सप्टेंबर : मोहम्मद नबीचं अर्धशतक आणि मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने तिरंगी टी20 मालिकेत बांगलादेशला 25 धावांनी पराभूत केलं. या विजयासह अफगाणिस्तानने विश्वविक्रम केला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने सलग 12 टी 20 सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. याआधीचा 11 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम त्यांच्याच नावावर होता. अफगाणिस्ताननंतर पाकिस्तानने सलग 9 सामने जिंकले आहेत.

मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद 164 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशनं 139 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशच्या संघाला 20 षटके खेळता आली नाहीत. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने 84 धावा केल्या. तर रहमानने 15 चेंडूत 4 गडी बाद केले.

अफगाणिस्तानने यासह ऑस्ट्रेलियाच्या एका विक्रमाची बरोबरी केली. त्यांनी एकही सामना न गमावता सर्वाधिक टी20 सामने खेळले. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने सलग 12 सामने न गमावता खेळले आहेत. यात अफगाणिस्तानने सर्व सामन्यात विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाचा एक सामना पावसामुळे टाय झाला होता.

तिरंगी मालिकेत बांगलादेशविरुद्ध विजयानं अफगाणिस्तान गुणतक्त्यात पहिलं स्थान पक्कं केलं आहे. अफगाणिस्तानने दोन सामन्यात दोन विजयांसह 4 गुण मिळवले आहेत. तर बांगलादेशनं एक विजय आणि एक पराभवासह 2 गुण पटकावले आहेत. झिम्बॉब्वेला आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही.

भाजपच्या दबावाला शिवसेना झुगारणार, पाहा SPECIAL REPORT

Published by: Suraj Yadav
First published: September 16, 2019, 2:44 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading