लिस्बन, 16 सप्टेंबर : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानावर नेहमीच आक्रमक दिसतो. मात्र, त्याच्या खासगी आयुष्यात तो हळवा आहे. आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्यानंतरही तो खंबीरपणे उभा राहिला पण एका टीव्ही शोमध्ये बोलताना त्याच्या भावनांचा बांध फुटला. रोनाल्डोनं जेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी त्यांचा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याला अश्रू रोखता आले नाहीत. रोनाल्डोनं त्यापूर्वी कधीच वडिलांचा व्हिडिओ पाहिला नव्हता. पियर्स मॉर्गन यांच्यासोबत तासभर चाललेल्या मुलाखतीवेळी त्याला व्हिडिओ दाखवला होता. 2004 मध्ये युरो कपच्या आधीचा हा व्हिडिओ असून वडील जॉस डेनिस यांनी त्याच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. 2004 मध्ये युरो कप पोर्तुगालमध्ये आयोजित कऱण्यात आला होता. या स्पर्धेनंतर काही दिवसांनी रोनाल्डोच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांना आपलं यश पाहता आलं नाही याचं दु:ख असल्याचं रोनाल्डो म्हणाला.
रोनाल्डोने त्याच्यावर बलात्काराचा आरोपामुळं वैयक्तिक आयुष्यात किती वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं याचाही खुलासा केला. एकदा दर कुटुंबासमोरच त्याच्याबद्दलची बातमी टीव्हीवर सुरू झाली. अचानक त्यानं चॅनेल बदललं असं रोनाल्डोनं सांगितलं. मुलाखतीबद्दल रोनाल्डो म्हणाला की, ही मुलाखत सहज हसत खेळत होईल असं वाटलं पण कधी रडेन असं वाटलं नव्हतं. वडील दारू प्यायचे त्यामुळं त्यांच्याशी कधीच नीट बोलणं झालं नाही. भाजपच्या दबावाला शिवसेना झुगारणार, पाहा SPECIAL REPORT