मुंबईकरांचं स्वप्न भंगलं, आता सचिन तेंडुलकरची फलंदाजी बघायला मिळणार नाही

मुंबईकरांचं स्वप्न भंगलं, आता सचिन तेंडुलकरची फलंदाजी बघायला मिळणार नाही

कोरोना व्हायरसचा परिणाम! बंद स्टेडियममध्ये होणार 'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज'

  • Share this:

मुंबई, 12 मार्च : कोरोना व्हायरसचा विळखा जवळपास 100 देशांना बसला आहे. भारतातही जवळपास 65हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 11 कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसमुळे बांग्लादेश इथे होणारे आशिया इलेव्हन टी- 20 सामने रद्द करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे IPL सामना रद्द करण्याबाबतही विचार सुरू आहे. 14 मार्चला यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार असून निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता सध्या सुरू असलेली रोड सेफ्टी वर्ल्ड क्रिकेट मालिकाही बंद स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या सर्व भागीदारांनी मिळून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. या मालिकेतील सर्व उर्वरित सामने हे डी. वाय. पाटील. बंद स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना मोठ्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. क्रिकेट प्रेमींना प्रत्यक्षात उपस्थित राहून खेळाचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे काहीसा क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजीचा सूर असल्याचं पाहायला मिळत आहे. खेळाडू, कर्मचारी आणि प्रेक्षकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेचा विचार करून हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-'कोरोना'मुळे IPL रद्द होणार? 48 तासांत सौरव गांगुली मोठा निर्णय घेण्याची शक्यता

डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार सामने

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि महाराष्ट्रात आढळलेल्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 14 ते 20 मार्च रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा तिसरा टप्पा होणार आहे. या सीरिजमधील अंतिम सामन्यासह इतर सामनेही डीवाय पाटील स्टेडियमवर होणार असून तिथे कोणत्याही प्रेक्षकाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे सर्व सामने बंद स्टेडियममध्ये सामने खेळले जातील. ज्या प्रेक्षकांनी आणि क्रिकेटप्रेमींनी या सामन्यांसाठी बुक माय शोवरून तिकीट बूक केली आहेत त्यांना 7 ते 10 दिवसांमध्ये पैसे रिफंड दिले जाणार आहेत. ज्यांनी ऑफलाईन तिकीटं घेतली आहेत त्या सर्व प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमींना 14 ते 17 मार्च या दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन (MCA) गेट 1 क्रमांकावर पुण्यातील सामन्यांच्या तिकीटांचे पैसे रिफंड देण्यात येणार आहेत.

हे वाचा-क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी! कोरोनामुळे आशिया आणि वर्ल्ड इलेव्हन टी-20 सामने

First published: March 12, 2020, 11:49 AM IST

ताज्या बातम्या