मुंबई, 3 मार्च : पुरुषांच्या बरोबरीने महिला क्रिकेटरनाही मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आणखीन संधी मिळावी या उद्देशाने बीसीसीआय तर्फे महिला प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून या स्पर्धेचे बिगुल वाजणार असून वुमन्स आयपीएलमधील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन यांमध्ये होणार आहे. 4 मार्च ते 26 मार्च या दरम्यान महिला प्रीमियर लीगचे सामने खेळवले जाणार असून यात 5 संघांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन , युपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल या संघांमध्ये महिला आयपीएलची पहिली ट्रॉफी मिळवण्यासाठी चुरस रंगणार आहे. मुंबईतील डी वाय पाटील, वानखेडे आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. सायंकाळी 7:30 वाजता या सामन्यांना सुरुवात होणार असून हे सामने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्स तसेच हॉट्स स्टारच्या ओटीटी प्लँटफॉर्मवर पाहायला मिळतील. गोळीबार करून हल्लेखोरांनी मेस्सीच्या नावे पाठवला संदेश; नक्की काय आहे प्रकरण?
पाहा सामन्यांचे शेड्युल : 4 मार्च - मुंबई इंडियन्स Vs गुजरात टायटन 5 मार्च - रॉयल चॅलेंजर्स Vs दिल्ली कॅपिटल 5 मार्च - यूपी वॉररिअर्स Vs गुजरात टायटन 6 मार्च - मुंबई इंडियन्स Vs रॉयल रॉयल चॅलेंजर्स 7 मार्च - दिल्ली कॅपिटल Vs यूपी वॉररिअर्स 8 मार्च - गुजरात टायटन Vs रॉयल चॅलेंजर्स 9 मार्च - दिल्ली कॅपिटल Vs मुंबई इंडियन्स 10 मार्च - रॉयल चॅलेंजर्स Vs यूपी वॉररिअर्स 11 मार्च -गुजरात टायटन Vs दिल्ली कॅपिटल 12 मार्च - यूपी वॉररिअर्स Vs मुंबई इंडियन्स 13 मार्च - दिल्ली कॅपिटल Vs रॉयल चॅलेंजर्स 14 मार्च - मुंबई इंडियन्स Vs गुजरात टायटन 15 मार्च - यूपी वॉररिअर्स Vs रॉयल चॅलेंजर्स 16 मार्च - दिल्ली कॅपिटल Vs गुजरात टायटन 18 मार्च - मुंबई इंडियन्स Vs यूपी वॉरियर्स 18 मार्च- रॉयल चॅलेंजर्स Vs गुजरात टायटन 20 मार्च - गुजरात टायटन Vs यूपी वॉरियर्स 20 मार्च - मुंबई इंडियन्स Vs दिल्ली कॅपिटल 21 मार्च - रॉयल चॅलेंजर्स Vs मुंबई इंडियन्स 21 मार्च - यूपी वॉरियर्स Vs दिल्ली कॅपिटल 24 मार्च - सेमी फायनल 26 मार्च - फायनल सामना