मुंबई, 3 मार्च : अर्जेंटिना येथील एका सुपरमार्केटवर काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडत अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सीसाठी एक संदेश पाठवला आहे. या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक पोलिसांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे.
अर्जेंटिनामधील तिसरे सर्वात मोठे शहर रोसारियोमधील युनिको सुपर मार्केटवर हा गोळीबार करण्यात आला आहे. मोटारसायकल वरून आलेल्या हल्लेखोरांनी सुपरमार्केटवर 12 हून अधिक गोळ्या झाडल्या. परंतु सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. युनिको सुपरमार्केट हे मेस्सीची पत्नि अँटोनेला रोकुजोच्या कुटुंबींयाच्या मालिकीचे आहे. तेव्हा या हल्ल्यानंतर गोळीबार करणाऱ्यांनी लिओनेल मेस्सीसाठी एक संदेश पाठवला. ज्यात मेस्सी आम्ही तुझी वाट पाहत आहोत. जावकिन देखील एक ड्रग्ज डिलर आहे त्यामुळे तो तुझी सुरक्षा करू शकणार नाही' असे लिहिले होते.
झाले असे की काही दिवसांपूर्वी अर्जेंटिनाच्या रोसारियो शहराचे महापौर पाब्लो जावकिन यांनी रोसारियोमध्ये सुपर मार्केटचा दौरा केला. यानंतर अमली पदार्थाच्या संबंधातील हिंसाचार रोखण्यात अधिकारी विफल ठरत असल्याचे त्यांना आढळले होते. यानंतर महापौर पाब्लो जावकिन यांनी प्रशाकीय यंत्रणांना धारेवर धरलं. यादरम्यान त्यांनी मेस्सीची पत्नि अँटोनेला रोकुजोच्या कुटुंबियांच्या मालिकांचे असलेले युनिको सुपर मार्केटला देखील भेट दिली होती. याप्रकारातूनच हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.