Home /News /sport /

EURO कपमधील काळजाचा ठोका चुकवणाऱ्या त्या घटनेनंतर मुंबई इंडियन्सचं Tweet Viral

EURO कपमधील काळजाचा ठोका चुकवणाऱ्या त्या घटनेनंतर मुंबई इंडियन्सचं Tweet Viral

तिसरा सामना डेन्मार्क आणि फिनलँडमध्ये सुरु असताना फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन (Christian Eriksen) अचानक मैदानात कोसळला. या घटनेनंतर इतर खेळाडूंनीही तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली.

    मुंबई 13 जून : यूरो कप 2020 (Euro Cup 2020) स्पर्धेतील एका घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला. कारण, तिसरा सामना डेन्मार्क आणि फिनलँडमध्ये सुरु असताना फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन (Christian Eriksen) अचानक मैदानात कोसळला. या घटनेनंतर इतर खेळाडूंनीही तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली. एरिक्सनला नेमकं काय झालं हे त्यांनाही समजत नव्हतं आणि हेच जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत होते. इतक्यात त्याठिकाणी वैद्यकीय टीम दाखल झाली. यानंतर तपासणी करून त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला. जगभरातील चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आता या घटनेबाबतचं मुंबई इंडियन्सचं ट्विट (Mumbai Indians Tweet) चांगलंच व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, की 'ख्रिश्चियन एरिक्सन, खंबीर राहा. आमची प्रार्थना तू आणि तुझ्या कुटुंबीयांसोबत आहे' मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरुन केलंलं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. EURO 2020 मध्ये भयंकर घटना, मॅच सुरू असताना मैदानातच कोसळला खेळाडू, LIVE VIDEO कोरोनानं अगदी सगळ्याच क्षेत्रांवर परिणाम केला आहे. याचाच परिणाम या स्पर्धेवरही दिसून आला. ही स्पर्धा साधारणपणे दर चार वर्षांनी खेळली जाते आणि मागील वर्षीच ती होणं अपेक्षित होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती २०२१ मध्ये घेण्याचं ठरवण्यात आलं. यातही विविध नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्यानं मर्यादीत प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येत आहे. ११ जुलैपर्यंत एकूण २४ संघांत युरो कप ही स्पर्धा खेळली जाणार आहे. दरम्यान यंदाच्या या स्पर्धेत डेन्मार्कची पहिल्या सत्रात पकड दिसली. जास्तीत जास्त वेळ फुटबॉल स्वत:जवळ ठेवण्यात त्यांना यश आलं आहे. 232 वेळा त्यांनी आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Euro 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या