केपटाऊन, 11 ऑगस्ट**:** आयपीएलमधली सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनं आता परदेशातल्या टी20 लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचं ठरवलं आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि दक्षिण आफ्रिकेतील टी20 लीगमध्ये मुंबई इंडियन्सनची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं दोन संघ विकत घेतले आहेत. या दोन संघांच्या नावाची घोषणाही काल झाली. एमआय एमिरेट्स आणि एमआय केपटाऊन हे संघ आगामी टी20 लीगसाठी सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर केपटाऊन संघात एमआयनं पाच खेळाडूंची जागाही नक्की केली आहे. रबाडा, रशिद खान एमआय केपटाऊनमध्ये या संघात दक्षिण आफ्रिकेचे दोन, इंग्लंडचे दोन आणि अफगाणिस्तानचा एक अशा पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात कगिसो रबाडा – दक्षिण आफ्रिका डेवाल्ड ब्रेविस – दक्षिण आफ्रिका लियाम लिव्हिंगस्टन - इंग्लंड सॅम करन - इंग्लंड रशिद खान – अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सचा डेवाल्ड ब्रेविस वगळता आयपीएलमध्ये इतर जण वेगवेगळ्या संघांचे भाग होते. रशिद गुजरातकडे, लिव्हिंगस्टन आणि रबाडा पंजाबमध्ये तर सॅम करन चेन्नईकडून खेळला होता. पण आता दक्षिण आफ्रिकेतल्या टी20 लीगमध्ये एकाच संघात खेळणार आहेत.
2️⃣ 🇿🇦 | 2️⃣ 🏴 | 1️⃣ 🇦🇫
— MI Cape Town (@MICapeTown) August 11, 2022
Read more on our first group of players joining @MICapeTown - https://t.co/68DXpU0DNp#OneFamily #MIcapetown @OfficialCSA pic.twitter.com/Ht9f5XgeOy
भक्कम संघबांधणीला सुरुवात- आकाश अंबानी यावेळी एमआय केपटाऊन संघाचे मालक आकाश अंबानी म्हणाले, ‘या पाच खेळाडूंच्या करारासह आम्ही एमआय केपटाऊन संघाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नव्या खेळाडूंचं स्वागत आणि डेवाल्ड ब्रेविसनं एमआय सोबतचा प्रवास सुरु ठेवल्याचा आनंद आहे. या नव्या प्रवासासाठी मी खूपच उत्साही आहे.’ हेही वाचा - Chennai Super Kings: धोनीनं रिटेन न केलेला हा खेळाडू पुन्हा परतला चेन्नई संघात जानेवारीत स्पर्धेला सुरुवात सहा संघांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेला मिनी आयपीएल असंही नाव देण्यात आलं आहे. कारण मुंबई इंडियन्ससह आयपीएलमधील अन्य पाच फ्रँचायझींनी या स्पर्धेत आपले संघ उतरवले आहेत. सीएसए टी****20 लीग फ्रँचायझी आणि संघ मुंबई इंडियन्स – केपटाऊन चेन्नई सुपर किंग्स – जोहान्सबर्ग दिल्ली कॅपिटल्स – सेंच्युरियन लखनौ सुपर जायंट्स – डरबन सनरायझर्स हैदराबाद – पोर्ट एलिझाबेथ राजस्थान रॉयल्स - पर्ल