मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Chennai Super Kings: धोनीनं रिटेन न केलेला हा खेळाडू पुन्हा परतला चेन्नई संघात

Chennai Super Kings: धोनीनं रिटेन न केलेला हा खेळाडू पुन्हा परतला चेन्नई संघात

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings: सीएसए टी20 लीगसाठी चेन्नई सुपर किंग्सनं फाफ ड्यू प्लेसीला आयकॉन खेळाडू म्हणून संघात घेतलं आहे. सीएसके फ्रँचायझीनं जोहान्सबर्ग हा संघ विकत घेतला आहे. या संघाचा फाफ हा प्रमुख चेहरा असेल.

  केपटाऊन, 11 ऑगस्ट: चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधल्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक. मुंबई इंडियन्सपाठोपाठ देशात सर्वात जास्त फॅन फॉलोईंग कुणाचं असेल तर ते आहे चेन्नई सुपर किंग्सचं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं आतापर्यंत चार वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. आणि सर्वाधिक आयपीएल विजेतेपदांच्या बाबतीत ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पण याच संघाचा महत्वाचा भाग असलेला प्रमुख खेळाडू यावर्षी झालेल्या मेगा लिलावात रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरच्या ताफ्यात गेला होता. पण आता त्याची चेन्नईच्या संघात पुन्हा वर्णी लागली आहे. हा खेळाडू आहे चेन्नईचा माजी सलामीवीर फाफ ड्यू प्लेसी. पण फाफ आयपीएलमधल्या चेन्नईच्या संघात नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमल्या सीएसके संघात सहभागी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत मिनी आयपीएल येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत टी20 लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी एक दोन नव्हे तर सहा भारतीय फ्रँचायझींनी संघ विकत घेतले आहेत. यात चेन्नई आणि मुंबईसह इतर चार आयपीएल फ्रँचायझींचा समावेश आहे. सीएसए टी20 लीग फ्रँचायझी आणि संघ
  • मुंबई इंडियन्स – केपटाऊन
  • चेन्नई सुपर किंग्स – जोहान्सबर्ग
  • दिल्ली कॅपिटल्स – सेंच्युरियन
  • लखनौ सुपर जायंट्स – डरबन
  • सनरायझर्स हैदराबाद – पोर्ट एलिझाबेथ
  • राजस्थान रॉयल्स - पर्ल
  हेही वाचा - FIFA WC2022: फिफा विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता, पाहा काय आहे कारण? फाफ ड्यू प्लेसी सीएसके या टी20 लीगसाठी चेन्नई सुपर किंग्सनं फाफ ड्यू प्लेसीला आयकॉन खेळाडू म्हणून संघात घेतलं आहे. सीएसके फ्रँचायझीनं जोहान्सबर्ग हा संघ विकत घेतला आहे. या संघाचा फाफ हा प्रमुख चेहरा असेल. 2018 ते 2021 या चार आयपीएल सीझनमध्ये फाफ ड्यू प्लेसी हा सीएसके संघाचा महत्वाचा भाग होता. सलामीवीर म्हणून त्यानं अनेकदा मोलाची भूमिका बजावली होती. 2018 आणि 2021 साली चेन्नईनं आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यात ड्यू प्लेसीचं मोठं योगदान होतं. पण 2022 च्या मेगा लिलावाआधी चेन्नईनं ड्यू प्लेसीला रिटेन केलं नाही. त्यामुळे लिलावात बंगलोरनं फाफवर सर्वाधिक बोली लावत विकत घेतलं. इतकच नव्हे तर बंगलोरचं कर्णधारपदही त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मुंबईचा संघही मैदानात आयपीएलमध्ये चेन्नईची पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडियन्सनंदेखील या स्पर्धेत आपला संघ उतरवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं कालच सीएसए टी20 लीगसाठी ‘एमआय केपटाऊन’ या नव्या संघाची घोषणा केली आहे.
  Published by:Siddhesh Kanase
  First published:

  Tags: Csk, MS Dhoni, Sports

  पुढील बातम्या