मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023: 12 वर्ष अन् 5 ट्रॉफीनंतर इमोशनल एक्झिट! मुंबई इंडियन्स सोडणार सगळ्यात मोठ्या 'मॅच विनर'ची साथ

IPL 2023: 12 वर्ष अन् 5 ट्रॉफीनंतर इमोशनल एक्झिट! मुंबई इंडियन्स सोडणार सगळ्यात मोठ्या 'मॅच विनर'ची साथ

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स

IPL 2023: आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात मुंबईनं सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईच्या या पाचही विजयांमध्ये कायरन पोलार्डचं योगदान फार मोठं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 नोव्हेंबर: आयपीएल 2023 साठी येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावाआधी फ्रँचायझींनी अनेक खेळाडूंना रिलीज केलं आहे. येत्या 23 डिसेंबरला ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. पण या लिलावाआधी मुंबई इंडियन्सनं एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 2010 पासून मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा भाग असलेला आणि तब्बल पाच वेळा मुंबईला आयपीएल जिंकून देणाऱ्या एका महत्वाच्या शिलेदाराला मुंबईनं संघातून रिलीज केल्याची माहिती आहे. हा खेळाडू आहे मुंबई इंडियन्सचा स्टार ऑल राऊंडर कायरन पोलार्ड.

पोलार्डची 12 वर्षांनी एक्झिट?

2010 साली मुंबईनं पोलार्डला करारबद्ध केलं होतं. त्यानंतर प्रत्येकवेळी त्याला रिटेन करण्यात आलं होतं. मुंबई संघाता गेली 12 वर्ष तो अविभाज्य भाग होता. पण गेल्या काही सीझनमध्ये पोलार्डचा परफॉर्मन्स खालावलेला दिसला. त्यामुळे एमआय फ्रँचायझीनं आगामी लिलावाआधी पोलार्डला रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात मुंबईनं सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईच्या या पाचही विजयांमध्ये कायरन पोलार्डचं योगदान फार मोठं आहे. त्यानं अनेक यादगार इनिंग केल्या आहेत. इतकच नव्हे तर बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही पोलार्डनं मुंबई इंडियन्ससाठी जबरदस्त कामगिरी बजावली आहे. पोलार्डसह मुंबईनं टिमल मिल्स आणि मयांक मार्कंडेलाही रिलीज केल्याची माहिती आहे.

पोलार्डचं आयपीएल करियर

सामने - 189

धावा - 3412

स्ट्राईक रेट - 147.3

अर्धशतकं - 16

विकेट्स - 69

हेही वाचा - Team India: टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं पुढचं मिशन कोणतं? पाहा संपूर्ण शेड्यूल

15 नोव्हेंबरला अंतिम फैसला

दरम्यान बीसीसीआयनं दहाही फ्रँचायझींना रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी देण्यासाठी 15 नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मुदत असेल. त्यानंतर लगेचच कोणत्या टीमनं कुणाकुणाला रिलीज केलं आणि कुणाला रिटेन केलं याची घोषणा केली जाईल. दरम्यान याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे.

23 डिसेंबरला मिनी ऑक्शन

कोची येथे येत्या 23 डिसेंबरला आयपीएलचं मिनी ऑक्शन पार पडणार आहे. आता ज्या खेळाडूंना रिलीज करण्यात येईल त्यांचा या ऑक्शनमध्ये समावेश होणार आहे. या खेळाडूंच्या फायनल लिस्टसाठी मंगळवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Ipl, Kieron pollard