Home /News /sport /

800 कोटींचा मालक असलेल्या धोनीचं एक असंही स्वप्न, क्रिकेट खेळून 30 लाख कमवायचे आणि...

800 कोटींचा मालक असलेल्या धोनीचं एक असंही स्वप्न, क्रिकेट खेळून 30 लाख कमवायचे आणि...

एमएस धोनीच्या निवृत्तीची बरीच चर्चा आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यात झालेल्या पराभवानंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. केएल राहुल, ऋषभ पंत यांच्यासारख्या खेळाडूंना संघात स्थान मिळाल्यामुळे धोनीला टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात कमबॅक करणे कठिण असेल.

एमएस धोनीच्या निवृत्तीची बरीच चर्चा आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यात झालेल्या पराभवानंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. केएल राहुल, ऋषभ पंत यांच्यासारख्या खेळाडूंना संघात स्थान मिळाल्यामुळे धोनीला टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात कमबॅक करणे कठिण असेल.

अब्जाधीशांच्या यादीत असलेल्या धोनीला मात्र एकेकाळी फक्त 30 लाख रुपये कमवून रांचीमध्ये रहायचं होतं. याचा खुलासा भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने केला आहे.

    नवी दिल्ली, 29 मार्च : गेल्या आठ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असूनही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही. क्रिकेटमध्ये धोनीनं लोकप्रियता आणि पैसे दोन्ही मिळवले. अब्जाधीशांच्या यादीत असलेल्या धोनीला मात्र एकेकाळी फक्त 30 लाख रुपये कमवून रांचीमध्ये रहायचं होतं. याचा खुलासा भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीचे तीनही कप जिंकले आहेत. 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी. अशी कामगिरी करणारा धोनी जगातला एकमेव कर्णधार आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरात आहे. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या धोनीनंसुद्धा आपण इतके यशस्वी होऊ असा विचार केला नव्हता. एका लहानशा शहरातून इतर खेळाडू जसे येतात तसाच धोनीही आला होता. भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने धोनीबाबत माहिती दिली आहे. त्याने म्हटलं की तो क्रिकेट खेळून 30 लाख रुपये कमवायचे आणि रांचीत रहायचे म्हणून आला  होता. वासिम जाफरने ट्विटरवर चाहत्यांशी चर्चा करताना एकाने विचारलं की, धोनीसोबतची आवडती आठवण कोणती? यावर जाफर म्हणाला की, जेव्हा धोनी भारताकडून खेळण्यासाठी आला होता. त्याला एक दोन वर्षे झाली होती त्यावेळी धोनीनं सांगितलं होतं की, मला क्रिकेट खेळून 30 लाख रुपये कमवायचे आहेत ज्यामुळे मी रांचीत आरामात राहू शकेन. हे वाचा : आफ्रिदीच्या मोहिमेत हरभजन सिंगचा सहभाग, आधी आपल्या देशात बघा असा लोकांचा सल्ला वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धोनी बाद झाला आणि भारताच्या विजेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या. त्यानंतर धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही. आयपीएलमधून तो पुन्हा दिसेल अशी चाहत्यांची आशा होती पण कोरोनामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आता यामुळे त्याला टीम इंडियात पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं वक्तव्य क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी केलं आहे. हे वाचा : धोनीला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 'DSP' आता कोरोना वॉरियर्स, ICCनही केलं कौतुक
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या