वर्षाला 800 कोटी कमवणाऱ्या धोनीने कोरोनाग्रस्तांना दिले फक्त 1 लाख, चाहते भडकले

महेंद्रसिंग धोनीने ही रक्कम मुकुल माधव फाउंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला Crowd फंडिंग वेबसाइटच्या माध्यमातून दिली आहे.

  • Share this:

रांची, 27 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात 23 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्णांची संख्या 700हून अधिक झाली आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी, देश आणि परदेशातील अनेक नामांकित मंडळी पुढे आली आहेत. मात्र भारतीय संघातील कोणत्याही क्रिकेटपटूंनी मोठी मदत केलेली नाही. माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांने 50 लाखांची मदत केली आहे. मात्र माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कोरोनाग्रस्तांसाठी 1 लाखांची मदत केली आहे. त्यामुळं चाहते धोनीवर भडकले आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे भारतात लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं आवश्यक सेवा वगळता इतर सर्व ठप्प झाले आहे, याचा थेट परिणाम मजुरीवर काम करणाऱ्यांच्या कुटुंबावर होत आहे. यासाठी सर्वक्षेत्रातील नामांकित लोकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहे. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने पुण्याती मजुरांसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. मात्र धोनीच्या या आर्थिक मदतीबाबत त्याचे चाहते सोशल मीडियावर नाराजी झाले आहेत.

दिवसभरात 15, एकूण 77 : वुहानसारखं मुंबई होणार देशातलं कोरोनाव्हायरसचं केंद्र?

चाहत्यांनी, धोनीची वार्षिक कमाई 800 कोटी असून केवळ 1 लाख रुपये मदत केली हे खेदजनक, असे मत व्यक्त केले आहे. त्याच वेळी सचिन तेंडुलकरने महाराष्ट्र सरकार व पंतप्रधान मदत निधीला 25-25 लाख रूपयांची देणगी दिली आहे.

धोनीने दिले रेशन सामान

महेंद्रसिंग धोनीने ही रक्कम मुकुल माधव फाउंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला Crowd फंडिंग वेबसाइटच्या माध्यमातून दिली आहे. या रकमेचा उपयोग पुणे येथील दैनंदिन वेतन मजुरांच्या कुटुंबीयांना रेशन वस्तू पुरवण्यासाठी केला जाईल. धोनीची पत्नी साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही लिंक शेअर केली आहे. धोनीच्या पुढाकारानंतर आणखी बरेच लोक मदतीसाठी पुढे आले असून आतापर्यंत 12 लाख रुपयांची मदत उभी करण्यात आली आहे.

धोनीचे पुणे कनेक्शन

पुण्याच्या रोजंदारीवर मजुरांसाठी एमएस धोनीने का दान केले, हा प्रश्नही अनेकांच्या मनात आला असेल. मात्र धोनी 2016 आणि 2017मध्ये आयपीएलच्या दोन हंगामात राइजिंग पुणे सुपरजायंट संघाचा भाग होता. धोनीने पुणे संघाने नेतृत्व केले होते. त्यामुळं धोनीसाठी पुणे खास आहे.

कोरोनाची दहशत बघा, महिला शिंकली म्हणून दुकानदारानं फेकलं 26 लाखांचं सामान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2020 03:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading