नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : आयपीएल 2020 संपल्यानंतर आता चाहते भारत-ऑस्ट्रेलिया (australia vs india) एकदिवसीय मालिकेसाठी उत्सुक आहे. आजपासून पहिल्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. असे सगळे असताना दुबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत असलेल्या धोनीचा (MS Dhoni Dance Video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी झिवा आणि पत्नी साक्षीसोबत थिरकताना दिसत आहे. याआधी धोनी डान्स करताना कधीच दिसला नव्हता.
धोनी कायम क्रिकेटचा सराव करताना किंवा जिममध्ये घाम गाळताना दिसतो. मात्र पहिल्यांदा चाहत्यांना पार्टी करणारा धोनी दिसला. या व्हिडीओमध्ये धोनी एका पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे. यावेळी धोनीसोबत पत्नी साक्षी आणि लेक झिवाही आहेत. हा व्हिडीओ धोनीचा आयपीएल संघ चेन्नई सुपरकिंग्जनं पोस्ट केला आहे.
वाचा-IND vs AUS : काय फायदा? रहाणेच्या हॉटेल रुमवरच्या सरावावर धवनचा निशाणा
चेन्नई सुपरकिंग्ज संघानं हा व्हिडीओ शेअर करताना यावर मजेदार कॅप्शन लिहिले आहे. सीएसकेनं, तुम्ही हा व्हिडीओ पाहताना चेहऱ्यावरचं हास्य थांबवू शकता का? अजिबात नाही. असे या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. दरम्यान, धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनी आयपीएल खेळणार आहे.