Home » photogallery » sport » INDIA VS AUSTRALIA PLAYERS FROM BOTH TEAMS PAID TRIBUTE TO AUSTRALIAS INDIGENOUS PEOPLE IN A BAREFOOT CIRCLE CEREMONY MHPG
India vs Australia 1st ODI: ...म्हणून सामन्याआधी शूज न घालता मैदानात उतरला भारतीय संघ, कारण वाचून कराल सलाम
सामन्याआधी या कारणामुळे कर्णधार विराट कोहलीसह सर्व खेळाडू शूज न घालता मैदानात गोलाकार उभे होते.
|
1/ 5
तब्बल 8 महिन्यांनंतर आज भारतीय संघ मैदानात उतरला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला आज सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीना निर्णय घेतला आहे.
2/ 5
मात्र या सामन्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू शूज न घालता गोलकार स्थितीत उभे राहिले. मात्र हा सरावाचा भागा नसून एक चांगल्या कारणास्तव खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे.
3/ 5
या मालिकेत स्वदेशी लोकांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात शूज न घालता गोलकार स्थितीत उभे राहिलेले दिसले. यात केवळ ऑस्ट्रेलियाचेच नाही तर भारतीय खेळाडूंचाही समावेश होता.
4/ 5
याआधी ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय उप-कर्णधार पॅट कमिन्सनं सांगितले की, त्यांच्या संघाला त्यांच्या देशात आणि जगात वर्णद्वेषाच्या समस्येचा सामना करण्याचा हा सर्वात चांगला मार्ग वाटत असल्याचे सांगितले.
5/ 5
एवढेच नाही तर, आजच्या सामन्यापूर्वी डोक्याला चेंडू लागून निधन झालेल्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूजला दोन्ही संघांनी श्रद्धांजली वाहिली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ह्यूजच्या स्मरणार्थ 63 सेकंद मौन बाळगले.