नवी दिल्ली, 18 जानेवारी: भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी आपल्या सोशल अकाऊंटवर भावुक पोस्ट लिहीत विराटने भारतीय टेस्ट टीमचे कर्णधार पद सोडत असल्याची माहिती दिली. विराटच्या या निर्णयानंतर त्याचे संघसहकारी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) विराटसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. सध्या त्याची पोस्ट चर्चेत आली आहे. विराटच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद सिराज भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहित आपली भावना व्यक्त केली आहे.
काय म्हटले आहे सिराजने पोस्टमध्ये? आपल्या सुपरहिरोसाठी, तुझ्याकडून मिळालेला पाठिंबा आणि प्रोस्ताहन मिळाले त्यासाठी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहे. तू माझ्यासाठी नेहमीच चांगला भाऊ आहेस, इतक्या वर्षांपासून माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तू नेहमीच माझा कर्णधार राहशील. अशी भावूक पोस्ट सिराजने विराटसाठी भावूक पोस्ट लिहीली आहे. या भावुक मेसेजसह सिराजने विराटसोबतचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. सिराजने आयपीएल कारकिर्दीची सुरुवातीची वर्षे कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीमध्ये घालवली. माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली त्याने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पदार्पण केले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली त्याने मेलबर्नमध्ये पहिली कसोटी खेळली आहे.