जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पनवेलकरांना दिलासादायक बातमी, 'त्या' 10 जणांना कोरोनाची लागण नाही!

पनवेलकरांना दिलासादायक बातमी, 'त्या' 10 जणांना कोरोनाची लागण नाही!

पनवेलकरांना दिलासादायक बातमी, 'त्या' 10 जणांना कोरोनाची लागण नाही!

नवी मुंबईतील पनवेलमधील 12 जण हे दिल्लीतील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे खळबळ उडाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

पनवेल, 04 एप्रिल : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच दिल्लीतील निजामुद्दीन इथं तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातील नागरिक परत आल्यामुळे खळबळ उडाली होती. परंतु, त्यापैकी आता काही जणांचे रिपोर्टहे निगेटिव्ह आले आहे. नवी मुंबईतील पनवेलमधील 12 जण हे दिल्लीतील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी 12 पैकी 10 जणांना शोधून काढलं. या 10 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या दहाही जणांची कोरोनाची चाचणीही निगेटिव्ह आली आहे.  हे सर्वजण पनवेलचे रहिवासी आहे. हेही वाचा - क्वारंटाइनमधील तबलिगी जमातच्या सदस्यांची अंडा करी आणि बिर्याणीची मागणी या 10 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे पनवेलकर आणि पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु, आणखी एकाचा शोध सुरू आहे. तर एक जण हा अद्याप परतला नाही. पनवेल परिसरात आतापर्यंत 15 कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. तबलिगी मरकज ठरलं कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट दरम्यान, दिल्लीच्या निजामुद्दीन इथे झालेली तबलिगी मरकज देशभरात कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट (Coronavirus Hotspot) ठरले आहे. या संमेलनात सहभागी झालेले अनुयायी तिथून देशभर हा संसर्ग घेऊन गेले आणि आता अनेक राज्यांमधून या तबलिगी अनुयायांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. हेही वाचा  - कोरोना कशाला जिवंत राहतोय? कॅशिअर इस्त्री घेऊनच बसलाय, पाहा VIDEO केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 14 राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित 647 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत.  या निजामुद्दीन मरकजमुळे दिल्लीत कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत 384 कोरोनाग्रस्त होते. त्यातले 259 मरकजमध्ये सामील झालेले किंवा त्यांच्या संपर्कातले आहेत. उर्वरित रुग्णांपैकी 58 परदेशी प्रवास करून आलेले आहेत. म्हणजेच दिल्लीत कोरोनाची साथ ही  मरकजमुळे पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात