मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ravindra Jadeja: पंतप्रधान मोदींनी का केलं जाडेजा आणि त्याच्या पत्नीचं कौतुक? जाणून घ्या कारण

Ravindra Jadeja: पंतप्रधान मोदींनी का केलं जाडेजा आणि त्याच्या पत्नीचं कौतुक? जाणून घ्या कारण

मोदींकडून रिवाबा जाडेजाचं कौतुक

मोदींकडून रिवाबा जाडेजाचं कौतुक

Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांनी त्यांच्या मुलीच्या 5व्या वाढदिवसाला 101 मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडलं. या प्रत्येक खात्यात त्यांनी 11000 रु. जमा केले आहेत.

  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 09 ऑगस्ट: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाचं सध्या कौतुक होत आहे. आणि त्या कौतुक करणाऱ्यांमध्ये एक नाव आहे ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं. मोदींनी जाडेजा आणि त्याच्या पत्नीचं खास कौतुक केलंय ते त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे. रवींद्र जाडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांनी त्यांच्या मुलीच्या 5व्या वाढदिवसाला 101 मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडलं. या प्रत्येक खात्यात त्यांनी 11000 रु. जमा केले आहेत. जून महिन्यात मुलगी निध्यना हिचा वाढदिवस साजरा झाला. त्याचवेळी रवींद्र जाडेजानं 101 मुलींसाठी सुकन्या योजनेअंतर्गत खातं उघडणार असल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधान मोदींकडून प्रशंसापत्र जाडेजा आणि त्याची पत्नी रिवाबाच्या या कार्याचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी एक पत्र लिहिलं आहे. जाडेजानं हे पत्र नुकतच ट्विटरवरुन शेअर केलं होतं. या पत्रात मोदींनी म्हटलंय... पोस्ट ऑफिसमध्ये 101 मुलींसाठी 101 सुकन्या समृद्धी खाती उघडण्याच्या तुमच्या कार्याबद्दल जाणून आनंद झाला. तुमची मुलगी निधी हिच्या 5 व्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक खात्यात सुरुवातीची रक्कम जमा करण्याचा हा सेवाभावी उपक्रम स्तुत्य आहे. तुम्ही समाजाच्या कल्याणासाठी असंच योगदान देत राहा. तुमच्या अशा सेवाभावी प्रयत्नांमुळे समाजात एक सकारात्मक संदेश जाईल आणि सगळ्यांना प्रेरणा मिळेल.’’ हेही वाचा - Serena Williams: टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्स होणार निवृत्त! पाहा कधी खेळणार अखेरची स्पर्धा? कोरोनाकाळातही जाडेजाकडून मदत कोरोनाकाळातही रवींद्र जाडेजानं गरजूंना मदत केली होती.  राजकोटमध्ये जाडेजानं आपल्या बहिणीच्या मदतीनं अशा नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता. आशिया चषक संघात जाडेजा दरम्यान नुकत्याच जाहीर झालेल्या आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात रवींद्र जाडेजाची निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत जाडेजानं केवळ दोन सामने खेळले होते. पण त्याची आजवरची कामगिरी पाहता आशिया चषकासाठी निवड समितीनं त्याच्यावर विश्वास टाकला आहे.
First published:

Tags: Ravindra jadeja, Sports

पुढील बातम्या