मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मिताली राजनं मास्टर ब्लास्टरलाही टाकलं मागे, 22 वर्षांहून जास्त खेळल्यानंतर केला असा रेकॉर्ड

मिताली राजनं मास्टर ब्लास्टरलाही टाकलं मागे, 22 वर्षांहून जास्त खेळल्यानंतर केला असा रेकॉर्ड

 महिला क्रिकेटविश्वात (Indian Women's Cricket Team) भारताचं नाव गाजवणाऱ्या आणि अनेक विक्रम करणाऱ्या मिताली राज (Mithali Raj Record) हिनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडीत काढला आहे

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: महिला क्रिकेटविश्वात (Indian Women's Cricket Team) भारताचं नाव गाजवणाऱ्या आणि अनेक विक्रम करणाऱ्या मिताली राज (Mithali Raj Record) हिनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडीत काढला असून, आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत प्रदीर्घ कारकीर्द (Longest Carrier in One Day Cricket) करण्याचा एक नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. पदार्पणाच्या सामन्यात शतक, सर्वांत तरुण शतकवीर, सर्वाधिक धावा असे अनेक विक्रम करणाऱ्या मितालीनं वन डे क्रिकेटमध्ये 22 वर्षे 231 दिवसांची कारकीर्द केली आहे.

12 फेब्रुवारी रोजी जेव्हा ती न्यूझीलंडविरुद्ध (Newzealand) मैदानात उतरली तेव्हा तिची वनडे कारकीर्द 22 वर्षे 231 दिवसांची झाली. यामुळे पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत वन डे क्रिकेटमधील कारकीर्द 22 वर्षे आणि 100 दिवसांपेक्षा जास्त असणारी ती जगातील पहिली व्यक्ती ठरली. याबरोबरच तिनं सचिन तेंडुलकरचा 22 वर्षे 91 दिवसांच्या कारकीर्दीचा विक्रम मोडीत काढला. मात्र आयपीएल 2022 साठी सुरू असणाऱ्या लिलावाच्या (IPL 2022 Auction) झगमगाटात मितालीचा हा विक्रम झाकोळून गेला. त्याची फारशी चर्चा झाली नाही.

हे वाचा-IPL मध्ये विक्रमी बोली लागूनही इशान किशन रोहितसोबत करणार नाही ओपनिंग? पाहा कारण

याआधी पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनची वन डे कारकीर्द 22 वर्षे 91 दिवसांची आहे. सचिननं पहिली वनडे मॅच 18 डिसेंबर 1989 रोजी खेळली होती तर शेवटची वनडे मॅच 18 मार्च 2012 रोजी खेळली होती. आता याबाबतीत मितालीने सचिनलाही मागं टाकलं आहे.

हे वाचा-IND vs WI : T20 सीरिजआधी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ऑलराऊंडर बाहेर!

मिताली राज 26 जून 1999 रोजी पहिली वनडे क्रिकेट मॅच खेळली होती. यातही तिनं एक विक्रम नोंदवला होता, जो अद्यापही मोडला गेलेला नाही. त्यानंतर अनेक विक्रम नोंदवणाऱ्या मितालीनं 12 फेब्रुवारी 2022 रोजी वन डे मॅच खेळत 22 वर्ष 231 दिवसांची कारकीर्द घडवण्याचा विक्रम केला. ती अद्याप निवृत्त झालेली नाही, त्यामुळे तिची एकदिवसीय कारकीर्द 23 वर्षांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. असं झालं तर इतकी प्रदीर्घ कारकीर्द करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरेल यात शंका नाही. आता सचिन तेंडुलकरच्या नावावर पुरूष क्रिकेटमधील असलेले इतर विक्रमही मिताली राज मोडू शकेल का याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल.

First published:

Tags: Mithali raj, Sachin tendulakar