जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI : T20 सीरिजआधी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ऑलराऊंडर बाहेर!

IND vs WI : T20 सीरिजआधी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ऑलराऊंडर बाहेर!

IND vs WI : T20 सीरिजआधी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ऑलराऊंडर बाहेर!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला (India vs West Indies T20) बुधवार 16 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर तिन्ही सामने होणार आहेत. याआधी वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडिजला 3-0 ने व्हाईट वॉश करणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जानेवारी : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला (India vs West Indies T20) बुधवार 16 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर तिन्ही सामने होणार आहेत. याआधी वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडिजला 3-0 ने व्हाईट वॉश करणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे टी-20 सीरिजमधून बाहेर झाला आहे. वॉशिंग्टनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमधून शानदार पुनरागमन केलं होतं. सुंदरऐवजी आता कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) टीममध्ये निवड झाली आहे. वॉशिंग्टन सुंदर याआधी मागच्या वर्षी घरच्या मैदानात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सीरिजवेळी दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे तो आयपीएलही खेळू शकला नाही. बऱ्याच काळानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केलं, यानंतर त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही निवड करण्यात आली, पण दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायच्या आधी सुंदरला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे तो जाऊ शकला नाही. सुंदरआधी वेस्ट इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून अक्षर पटेलही बाहेर झाला आहे. सुंदर आता अक्षर पटेल आणि केएल राहुलसोबत एनसीएच्या रिहॅबमध्ये जाणार आहेत. केएल राहुलला वेस्ट इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेवेळी फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. केएल राहुलच्या मांसपेशी खेचल्या गेल्या आहेत, तर अक्षर पटेल पायाच्या दुखापतीतून पूर्ण बरा झालेला नाही, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही जाऊ शकला नव्हता. भारत-वेस्ट इंडिज टी-20 सीरिज वेळापत्रक 16 फेब्रुवारी- पहिली टी20, कोलकाता 18 फेब्रुवारी- दुसरी टी20, कोलकाता 20 फेब्रुवारी- तिसरी टी20, कोलकाता भारताची टी-20 टीम रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव वेस्ट इंडिजची टीम कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन एलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेज, शेल्डन कॉट्रेल, डोमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, ब्रेडन किंग, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, काइल मायर्स, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श जूनियर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात