मुंबई, 22 जानेवारी : ओडिशा येथे सुरु असलेल्या पुरुष हॉकी वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार आहे. आज भारतीय हॉकी संघाला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी न्यूझीलंडला हरवणं गरजेचं आहे. 22 जानेवारी रोजी कलिंगा स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड मध्ये क्रॉस ओव्हर सामना रंगणार असून यात बाजी मारून स्पर्धेतील टॉप 8 संघांमध्ये कोण स्थान मिळवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
भारतीय हॉकी संघ मागच्या सामन्यात वेल्स संघाला हरवून देखील सरळ क्वाटर फायनलमध्ये स्थान मिळवू शकली नाही. वेल्स विरुद्धचा सामना भारताने 4-2 च्या आघाडीने जिंकला परंतु ग्रुप D मध्ये प्रथम स्थानी असलेल्या इंग्लंडने केलेल्या गोल संख्येशी बरोबरी करता न आल्याने भारतीय संघाला अजून एक सामना खेळावा लागणार आहे.
हे ही वाचा : किंग कोहली, हिटमॅन रोहितनंतर आता शुभमनलाही मिळालं नवं नाव
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रॉसओव्हर सामना 22 जानेवारी रोजी कलिंगा स्टेडियमवर होणार आहे. जर टीम इंडिया न्यूझीलंडचा पराभव करण्यात यशस्वी ठरली तर उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या बेल्जियमचा सामना करावा लागेल. रविवारी सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
हे ही वाचा : चायनीज, पनीर अन् बरंच काही... टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये खायला काय असतं? चहलने दाखवला Video
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणारा रोमांचक सामना प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर पहायला मिळेल. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण हॉट्स स्टार अँपवर पहायला मिळणार असून प्रेक्षकांना हा सामना फ्री मध्ये FanCode वर पाहता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hockey, Hockey World Cup 2023, Sports, Team india