मुंबई, 16 मार्च : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सोमवारी स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत (Sanjana Ganeshan) लग्न केलं. यानंतर टीम इंडियाच्या सगळ्याच खेळाडूंनी दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, पण या दोघांचं अभिनंदन करताना मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने मात्र मोठी चूक केली. बुमराहला शुभेच्छा देणारं ट्विट करताना मयंकने संजना गणेशनला टॅग करण्याऐवजी संजय बांगरला (Sanjay Bangar) टॅग केलं.
मयंक अग्रवालला जेव्हा त्याची चूक लक्षात आली तेव्हा त्याने आपलं ट्वीट डिलीट केलं, पण चाहत्यांनी मात्र त्याच्या या ट्वीटचा स्क्रीनशॉट घेतला आणि मयंकला ट्रोल करायला सुरूवात केली. 'अभिनंदन जसप्रीत बुमराह आणि संजय बांगर, तुमचं आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी राहो,' असं मयंक अग्रवाल त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.
जसप्रीत बुमराहने गोव्यामध्ये स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत लग्न केलं, यानंतर कर्णधार विराट कोहली, केएल राहुल यांच्यासह अनेक खेळाडूंनी दोघांना शुभेच्छा दिल्या. बुमराहनेही सोसल मीडियावर फोटो पोस्ट करत लग्नाची बातमी दिली. प्रेमाने प्रेरित होऊन, आम्ही दोघांनी नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे. आज आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस आहे, असं बुमराह त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला.
View this post on Instagram
लग्नानिमित्त बुमराहने सुट्टी घेतली होती, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये तो खेळला नव्हता, तसंच टी-20 सीरिजमध्येही त्याला आराम दिला गेला होता. तीन मॅचच्या वनडे सीरिजमध्येही त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. बुमराहच्या गैरहजेरीतही टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने दोन्ही टी-20 मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Goa, Jasprit bumrah, Marriage, Social media viral, Team india, Twitter