Home /News /sport /

न्यूझीलंडच्या खेळाडूने चहलला दिली शिवी, रोहित शर्मावर आली LIVE शोमधून पळून जाण्याची वेळ

न्यूझीलंडच्या खेळाडूने चहलला दिली शिवी, रोहित शर्मावर आली LIVE शोमधून पळून जाण्याची वेळ

युझवेंद्र चहलने न्यूझीलंडचा पराभव झाल्यानंतर गुप्टिलला कसा आहेस असा प्रश्न लाइव्ह प्रक्षेपण सुरू असतानाच विचारला. त्यावेळी गुप्टिलने त्याला चक्क हिंदीतून शिवी दिली.

    ऑकलंड, 26 जानेवारी : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 ने आघाडी घेतली आहे. सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडचा एक खेळाडू मार्टिन गुप्टीलने मोठी चूक केली आहे. त्याने भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलला शिवी दिली आहे. गुप्टीलने चक्क लाइव्ह शो सुरू असतानाच शिवी दिल्यानंतर रोहित शर्मा तोंडावर हात ठेवून पळून गेला. दुसरा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. तेव्हा युझवेंद्र चहल माइक घेऊन मार्टिन गुप्टिलकडे गेला. तेव्हा चहलने कसा आहेस असा प्रश्न विचारला. हिंदीत विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देत असताना मार्टिन गुप्टिलने शिवीच हासडली. त्यावेळी शेजारी असलेला रोहित शर्माला धक्काच बसला. तो थेट तोंडावर हात ठेवून तिथून पळून गेला. गुप्टिलने शिवी देताच चहलने सांगितलं की, माइक सुरु आहे आणि शो लाइव्ह सुरू आहे. मात्र तोपर्यंत फारच उशिर झाला होता. गुप्टिलने शिवी दिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याआधी भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसला. भारताच्या गोलंदाजीसमोर 20 षटकांत न्यूझीलंडने 132 धावा केल्या. भारताने हे आव्हान 17.2 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. केएल राहुलने नाबाद अर्धशतक तर श्रेयस अय्यरने 44 धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या शिवम दुबेने षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केलं. 'केएल राहुलचं यष्टीरक्षण संघाला महागात पडणार, धोनीचं मौन समजण्यापलिकडे'
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Rohit sharma, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या