VIDEO: पॉल अ‍ॅडम्सचे 2019 मधील व्हर्जन; गोलंदाजी पाहून तुम्ही व्हाल हैराण

VIDEO: पॉल अ‍ॅडम्सचे 2019 मधील व्हर्जन; गोलंदाजी पाहून तुम्ही व्हाल हैराण

क्रिकेट विश्वात असा एक गोलंदाज आला आहे ज्याने गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल अ‍ॅडम्स (Paul Adams)तुम्हाला त्याच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमुळे नक्कीच आजही आठवत असेल. पॉलची गोलंदाजीची अ‍ॅक्शन एकाकाळी क्रिकेट चाहत्यामध्ये चर्चेचा विषय ठरायची. पॉलने गोलंदाजीच्या विचित्र अ‍ॅक्शनमुळे फलंदाजांना अनेक वेळा अडचणी आणले आहे. पॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 15 वर्षांचा कालावधी लोटला आहे. असे असले तरी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पॉल अ‍ॅडम्सची आठवण आली आहे. क्रिकेट विश्वात असा एक गोलंदाज आला आहे ज्याने गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अबूधाबी टी-10 लीग( Abu Dhabi T10 League)मध्ये बांग्ला टायगर्सकडून खेळणारा श्रीलंकेचा फिरकीपटू केव्हिन कोट्ठीगोडा (Kevin Koththiigoda)हा त्याच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शन चर्चेत आला आहे. 21 वर्षीय केव्हिनची तुलना पॉलशी केली जात आहे. अर्थात विचित्र पद्धतीने गोलंदाजी करणारा पॉल हा पहिला क्रिकेटपटू नाही. केव्हिनची गोलंदाजी पॉलसारखी आहे. केव्हिनच्या गोलंदाजीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि क्रिकेट चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

आयपीएलच्या 2016 सीझनमध्ये गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या शिविल कौशिक (Shivil Kaushik) देखील अशाच विचित्र गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमुळे चर्चेत आला होता. केव्हिनच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांच्या मते एखादा गोलंदाज अशा पद्धतीने कशी काय गोलंदाजी करू शकतो याची कल्पनाच करता येत नाही. तर एका चाहत्याने केव्हिनला पॉल अ‍ॅडम्सचे 2019मधील व्हर्जन असल्याचे म्हटले आहे.

अर्थात चर्चेत येण्याची केव्हिनची ही पहिली वेळ नाही. मलेशियामध्ये 2017मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत केव्हिनने सर्वांचे लक्ष वेधले होते. उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या केव्हिन याने तेव्हा अफगाणिस्तानविरुद्ध एक विकेट घेतली होती.

Published by: Akshay Shitole
First published: November 19, 2019, 10:08 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading