नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. यात पहिला सामना भारत-पाकिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड-बांगलादेश आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तानने क्वार्टर फायनलमध्ये अफगाणिस्तानला पराभूत केलं. अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानला रोखण्यासाठी जितके शक्य होतील तितके प्रयत्न केले. अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 189 धावा केल्या होत्या. या धावांचे रक्षण करण्याची जबाबदारी गोलंदाजांवर होती. यातच अफगाणिस्तानचा 16 वर्षीय गोलंदाज नूर अहमदने रविचंद्रन अश्विन प्रमाणेच मंकडिंगचा वापर केला. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारे फलंदाजाला बाद करण्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हुरैरा सध्या फॉर्ममध्ये आहे. तो अफगाणिस्तान संघासमोर भिंत बनून उभा राहिला होता. त्याला बाद करून नूर अहमदने मोठा अडथळा दूर केला. 64 धावांवर खेळणाऱ्या हुरैराला नूर अहमदने मांकडिंग पद्धतीने बाद केलं. यामुळे नूरवर टीकाही केली जात आहे.
मांकडिंगचा हा वादग्रस्त प्रकार 28 व्या षटकात झाला. पाकिस्तानने त्यांचे दोन गडी लवकर गमावले होते. त्यानंतर मोहम्मद हुरैराने डाव सावरला होता. मात्र त्याला बाद करून नूरने अफगाणिस्तानला मोठं यश मिळवून दिलं. त्यावेळी पंचांनी गोलंदाजाला अपीलावर आणखी एकदा चर्चा करण्यास सांगितलं. त्यानंतर रिप्लेमध्ये चेंडू टाकण्याआधी हुरैरा क्रीजमधून बाहेर गेला होता आणि नियमानुसार तो बाद असल्याचं स्पष्ट झालं. दुखापतीमुळं संपणार भारतीय खेळाडूचे करिअर? न्युझीलंड दौऱ्यातून घेतली माघार आयपीएलच्या 12 व्या हंगामात अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने धावबाद केलं होतं. यानंतर त्याच्यावर अनेकांनी अखिलाडुवृत्तीचा आरोप केला होता. तर अनेकांनी त्याची बाजू घेत हे क्रिकेटच्या नियमानुसार केल्याचं म्हटलं होतं. आता नूर अहमदनेही अशाच पद्धतीने बाद केल्यानं पुन्हा खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. NADA कडून ‘गलती से मिस्टेक’, वर्ल्ड चॅम्पियन पैलवानाला बंदीचा मनस्ताप

)







