नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : भारताच्या क्रीडा क्षेत्रात डोपिंगमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. भारताचा पैलवानही या डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. रविंदर कुमार डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. या प्रकरणात नाडाच्या एका चुकीमुळे वर्ल्ड चॅम्पियन पदक विजेत्या पैलवानाला मनस्ताप सहन करावा लागला. नाडाने सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलेल्या पैलवानाचे नाव सांगताना त्याने रौप्य पदक पटकावल्याचं म्हटलं होतं. मात्र, रविंदर कुमारने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावलेलं नाही. नाडाने दिलेली माहिती चुकीची असल्याचे समोर येण्याआधी पदक जिंकलेल्या रविंदरला मनस्ताप झाला. नाडाने रविंदर कुमार याच्यावर बंदी घातली आहे. तर अंडर 23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रविंदर दहियाने पदक पटकावले आहे. केवळ नाम साधर्म्यामुळे नाडाकडून चुक झाली आणि त्यामुळे रविंदर दहियावर बंदीची कारवाई झाल्याचा समज चाहत्यांचा झाला.  रविंदर दहियाने पीटीआयशी बोलताना याबाबत खुलासा केली. तो म्हणाला की, ज्या रविंदरवर बंदी घालण्यात आली आहे. नाडाने ज्याची माहिती दिली आहे तो मी नाही. नाडाने माझी कोणतीही चाचणी केलेली नाही. मी हवाई दलात काम केलं आहे पोलिसांत नाही. नाडाने ज्या रविंदरवर बंदी घातली होती त्याची चाचणी गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात चाचणी घेतली होती. त्यावेळी जयपूरमध्ये 67 वी अखिल भारतीय कुस्ती चॅम्पियनशिप सुरू होती. नाडाने गेल्या वर्षी 14 मे रोजी रविंदर कुमारवर निलंबनाची कारवाई केली होती. कोहलीच्या रॉकेट थ्रोने किवींच्या तोंडचा घास पळवला, ‘त्या’ रनआऊटने बदलला सामना बंदी घालण्यात आलेला रविंदर कुमार वर्ल्ड चॅम्पियन नाही हे समजताच नाडाने सोशल मीडियावर माफी मागत स्पष्टीकरण दिलं. नाडाने म्हटलं की, बंदी घालण्यात आलेला रविंदर कुमार आणि अंडर 23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेला रविंदर दोन्ही एक नाहीत. चुकीच्या माहितीमुळे असे झाले. VIDEO : …आणि श्रेयस अय्यरसह टीम इंडियाची यंग ब्रिगेड झाली ‘स्ट्रीट डान्सर’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







