मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

FIFA Word cup दरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डोचा धक्कादायक निर्णय, चाहत्यांची निराशा

FIFA Word cup दरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डोचा धक्कादायक निर्णय, चाहत्यांची निराशा

रोनाल्डो

रोनाल्डो

युनायटेड आणि मॅनेजर एरिक डेन हाग यांनी आपला विश्वासघात केल्याचे रोनाल्डोने एका टीव्ही शोमध्ये आपल्या जवळच्या मित्राला सांगितल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना वेग आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि इंग्लंडचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड यांच्यात ज्याची शंका होती, नेमकं तेच घडलं. दोघेही मंगळवारी एकमताने वेगळे झाले आहेत. मँचेस्टर युनायटेडने एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, त्यांनी आणि रोनाल्डोने समान संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड आणि मॅनेजर एरिक डेन हाग यांनी आपला विश्वासघात केल्याचे रोनाल्डोने एका टीव्ही शोमध्ये आपल्या जवळच्या मित्राला सांगितल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना वेग आला होता. रोनाल्डोने स्पष्टपणे क्लब आणि त्याच्या व्यवस्थापकांवर नाराजी व्यक्त केली होती.

रोनाल्डोचा इंग्लिश क्लबसोबतचा हा दुसरा करार होता. यापूर्वी, जेव्हा तो त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात करत होता तेव्हा तो या क्लबचा भाग होता. यानंतर तो दिग्गज स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदमध्ये गेला आणि तेथे बराच काळ घालवला. यानंतर तो इटलीच्या जुव्हेंटस क्लबमध्ये गेला आणि तिथून मँचेस्टर युनायटेडला परतला.

क्लब आणि रोनाल्डोकडून निवेदन -

क्लब आणि रोनाल्डो दोघांनीही त्यांच्याकडून विधाने प्रसिद्ध केली आहेत आणि विभक्त होण्याविषयी सांगितले आहे. दोघांनीही सहमतीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. क्लबने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “क्रिस्टियानो रोनाल्डो तत्काळ मँचेस्टर युनायटेडला निरोप देत आहे. सर्वसहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे दोन वेळा खेळल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानू इच्छितो. यादरम्यान त्याने 346 सामन्यांमध्ये 145 गोल केले. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मँचेस्टर युनायटेडमधील प्रत्येकजण एरिकच्या मार्गदर्शनाखाली संघाला पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करतो.”

हे वाचा - इराणच्या टीमचा राष्ट्रगीत गायनास नकार, फिफा वर्ल्ड कपच्या मैदानात पाहा काय घडलं?

रोनाल्डो म्हणाला, "मँचेस्टर युनायटेडशी बोलल्यानंतर आम्ही सर्वसहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मला मँचेस्टर युनायटेड आणि चाहत्यांवर माझे प्रेम आहे. हे कधीही बदलणार नाही. मात्र, माझ्यासाठी नवीन आव्हाने स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. उर्वरित हंगामासाठी मी संघाला शुभेच्छा देतो.

हे वाचा - क्रिकेट नही तो फुटबॉल सही! टॉसला झाला उशीर, खेळाडूंनी असा केला 'टाईमपास'

आता कुठे जाणार रोनाल्डो?

आता प्रश्न असा आहे की, रोनाल्डो कोणत्या क्लबसाठी खेळणार? तो ज्या प्रकारचा खेळाडू आहे, त्याला मिळवण्यासाठी क्लबची झुंज नक्कीच असेल. सध्या रोनाल्डो फिफा विश्वचषक-2022 मध्ये व्यग्र असून त्याचे संपूर्ण लक्ष गुरुवारी पोर्तुगाल आणि घाना यांच्यातील सामन्यावर असेल.

First published:

Tags: Football, Sport, Sports