खेळताना क्रिकेटचा चेंडू लागल्याने 12 वर्षाच्या मुलावर केला गोळीबार, दोघांना अटक

खेळताना क्रिकेटचा चेंडू लागल्याने 12 वर्षाच्या मुलावर केला गोळीबार, दोघांना अटक

मुलं खेळत असताना चेंडू लागल्याच्या रागातून दारूच्या नशेत असलेल्या दोघांपैकी एकाने पिस्तुलातून मुलावर गोळीबार केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : क्रिकेट खेळत असलेल्या एका 12 वर्षीय मुलावर गोळीबार केल्याची घटना उत्तराखंडमधील टिहरी इथं घडली आहे. मुलं खेळत असताना चेंडू लागल्याच्या रागातून दारूच्या नशेत असलेल्या दोघांपैकी एकाने पिस्तुलातून मुलावर गोळीबार केला. यात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीसह दोघांना ताब्यात घेतलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बालगंगा तालुक्यातील भेटी गावात मुलं क्रिकेट खेळत होती. यावेळी चेंडू तिथं असेलल्या रामलाल यांच्या घरात गेला. तेव्हा चेंडू आणण्यासाठी महेश गेला. त्यावेळी घरामध्ये सैन्यातून निवृत्त झालेले विजय कंडारी हेसुद्धा होते. त्यांच्याकडे बंदूक होती.

महेश जेव्हा चेंडू घेण्यासाठी अंगणात पोहोचला तेव्हा रागाच्या भरात रामलाल यांनी कंडारी यांच्याकडील बंदुकीतून गोळी झाडली. बंदुकीतून उडालेले छर्रे महेशला लागल्यानं तो जखमी झाला. महेशच्या उजव्या डोळ्याला इजा झाली आहे.

वाचा : प्रिती झिंटाला मोठा झटका, 10.75 कोटींना विकत घेतलेला खेळाडू IPL खेळणार नाही

तहसिलदार राजेंद्र सिंग रावत यांनी सांगितलं की, मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथं मुलावर उपचार सुरू आहेत. महेशच्या आईने आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी रामलाल आणि विजय यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाचा : 'दादा, BCCI अध्यक्ष आहात आता तरी...', गांगुलीला युवराजने दिला सल्ला

First published: February 14, 2020, 4:40 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading