नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली झाली. गेल्याच वर्षी युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर युवराज सोशल मीडियावर सक्रीय झाला आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौरव गांगुलीचे अभिनंदन करताना त्यानं खोचक टीकाही केली होती. आता पुन्हा एकदा त्यानं सौरव गांगुलीच्या पोस्टवर युवराजने सल्ला दिला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गांगुली राहुल द्रविडसोबत खेळपट्टीवर दिसत आहे. याला कॅप्शन देताना जबरदस्त आठवणी असा कॅप्शन गांगुलीने दिला आहे. युवराजने यावर कमेंट करताना गांगुलीला एक सल्ला दिला आहे. गांगुलीने शेअऱ केलेल्या फोटोवर लोगो आहे. आणि त्या लोगोसह फोटो शेअर केल्यानं युवराजने सल्ला दिला आहे. युवराज म्हणाला की, दादा लोगो तरी काढा. आता तुम्ही बीसीसीआय अध्यक्ष आहात. थोडे प्रोफेशनल व्हा.
गांगुलीने शेअर केलेला फोटो 1996 च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील आहे. त्यावेळी भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात इंग्लंडने 344 धावा केल्या होत्या. यात इंग्लंडच्या जॅक रसेलनं शतकी तर ग्राहम थोर्पेने 89 धावा काढल्या होत्या. भारताकडून वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने जबरदस्त खेळ केला होता. त्याने पाच फलंदाजांना बाद केलं होतं. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर गांगुलीने शतक आणि राहुल द्रविडने 95 धावा करत संघाला 429 धावांपर्यंत पोहचवलं होतं. आघाडी घेतल्यानंतर भारताला इंग्लंडच्या फलंदाजांना दुसऱ्या डावात रोखता आलं नाही. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला होता. सौरव गांगुली त्याच्या पदार्पणात शतक करणारा भारताचा दहावा क्रिकेटपटू ठरला होता. अंजली नाही तर दुसरं कुणीतरी आहे मास्टर ब्लास्टरचं ‘पहिलं प्रेम’, शेअर केला VIDEO