नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या भारतीय सेनेसोबत काश्मीरमध्ये लष्काराचे परिक्षण घेत आहे. टेरिटोरियल आर्मीमध्ये काम करण्यासाठी धोनीनं क्रिकेटमधून दोन महिन्यांची विश्रांती घेतली. मात्र, या सगळ्यात धोनी आपलं पहिले प्रेम विसरू शकला नाही आहे. ते म्हणजे गाड्या. धोनीची पत्नी साक्षी हिनं सोशल मीडियावर एका गाडीचा फोटो टाकला आहे, धोनीनं लष्करात जाण्याआधी ही गाडी घेतली होती. ही गाडी आहे जीप ग्रेंड शेरोकी ट्रेकहॉक. धोनीचे गाडी आणि बाईक प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, सध्या लष्करात असल्यामुळं आपल्या नव्या गाडीतून धोनी फिरू शकत नाही आहे.
धोनीनं घेतलेल्या Jeep Grand Cherokee Trackhawk या गाडीची किंमत आहे 80 ते 90 लाख. ही गाडी 6.2L HEMI V8 इंजिन क्षमतेची आहे. साक्षीनं या गाडीचा फोटो शेअर करत, “रेडबीस्ट तुझं स्वागत आहे! धोनी अखेर तुझं खेळणं आलं आहे, त्यामुळं आम्ही तुला खूप मिस करत आहोत. तू लवकर ये ही गाडी आपल्या नागरिकत्वाची वाट पाहत आहे. कारण भारतातली ही पहिली गाडी आहे”, असे लिहिले.
वाचा-विराट मोडणार पाकच्या माजी कर्णधाराचा 26 वर्षांपूर्वीचा विक्रम!
धोनीचे गाडी प्रेम
धोनीचे गाडी प्रेम सर्वांना माहित आहे. धोनीकडे फरारी 599 जीटीओ, हॅमर एच-2, जीएमसी सिएरा अशा गाड्या आहेत. तर, भारतात कोणाकडे नसतील अशा बाईकचा संग्रह आहे. धोनीकडे कावास्की निन्जा एच-2, कोनफेडेरेट हेलकॅट, बीएसए, सुजूकी हायाबूसा आणि एक नॉर्टन विंटेज अशा बाईक आहेत.
वाचा-विराटची बॅटिंग शास्त्रींचं समालोचन, शेअर केला हा VIDEO
जीप ग्रेंड शेरोकी ट्रेकहॉक गाडीचे वैशिष्ट्य
धोनीची नवीन गाडी 5 सीटर असून 6100 सीसी इंजिन आहे. साथ ही 8 गिअर आणि इंजिनची क्षमता 707 एचपी आहे. या गाडीत पॉवर स्टेअरिंग, अण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॉवर विंडो फ्रंट. ही गाडी भारतात अजूनही आलेली नाही. धोनीनं ब्रिटेनवरून ही गाडी आयात केली आहे.
वाचा-VIDEO : ऋषभ पंतचा थेट हॉटेलच्या पॅसेजमध्येच सराव; कारण देताना म्हणाला...
VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत सगळ्याची सोय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, Sakshi dhoni